Kon Honar Crorepati: करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. स्वबळ आणि ज्ञान यांच्या मदतीने मिळणार्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा.
कारण लवकरच येतंय 'कोण होणार करोडपती'चं पुढचं पर्व. धनलक्ष्मी, प्रतिष्ठा आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्याची हीच वेळ आहे. 'कोण होणार करोडपती' या जगद्विख्यात कार्यक्रमाच्या या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरू होते आहे.
या वर्षी स्पर्धकांना १ मिस्डकॉल देऊन दोन करोड रुपये जिंकण्याची संधी आहे! सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' हा मराठी रिॲलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. 'मनोरंजनासह ज्ञानार्जन' हे वैशिष्ट्य असणार्या या कार्यक्रमात अवगत असलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हांला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं, याची प्रचिती मागच्या पर्वांमधून सगळ्यांना आली आहे.
या कार्यक्रमामध्ये आलेल्या स्पर्धकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी सोनी मराठी वाहिनी हि संधी घेऊन येत आहे.
'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन या वर्षीही प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. सचिन खेडेकर उत्तम अभिनेते आहेतच, पण स्पर्धेतल्या स्पर्धकांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचं कामही ते मोठ्या कौशल्यानी करतात. त्यामुळे स्पर्धेतले सहभागी स्पर्धक अधिक आत्मविश्वासानी आणि चांगल्या प्रकारे खेळू शकतात.
या वर्षी सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना १४ दिवसांत १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २ मार्चपासून नोंदणी सुरू होते आहे.
२ मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न, असे १४ प्रश्न विचारले जाणार आहेत. '70390 77772' या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना नोंदणी करता येईल. सोनी मराठी वाहिनीने 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाद्वारे १ मिस्डकॉल देऊन २ करोड जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थानं साकार होऊ शकतं. २ मार्चपासून १५ मार्चपर्यंत रोज एक प्रश्न. ज्ञान, मनोरंजन आणि रसिक प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यासाठी तयार राहा, कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येणार आहे, 'कोण होणार करोडपती'!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.