Vetoba Marathi Serial News: कोकणातल्या प्रथा आणि परंपरा यांची कायम चर्चा असते. कोकणातील अशीच एक गोष्ट चर्चेत आहे ती म्हणजे वेतोबा. वेतोबा ला कोकणातील देव मानतात. श्रीदेव वेतोबा मंदिर वेंगुर्लेपासून १२ कि.मी. अंतरावरील निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत आहे. श्रीदेव वेतोबा हे दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असे पुरातन देवस्थान मानले जाते. याच वेतोबा वर आधारित नवी मराठी मालिका सोनी मराठीवर सुरु होतेय.
(konkan god vetoba story coming on new marathi serial aired on sony marathi)
सोनी मराठीवर नवीन मालिकेचा प्रोमो रिलीज झालाय. रक्षणकर्ता वेतोबा असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत वेतोबाच्या पादुका दिसत असून केळीचं झाड दिसत आहे. रक्षणकर्ता वेतोबा मालिकेचा हा खास प्रोमो अल्पावधीतच चर्चेत आहे. यानिमित्ताने होळी आणि रंगपंचमीच्या मुहूर्तावर कोकणातील रक्षणकर्ता मानल्या जाणाऱ्या वेतोबाची कहाणी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
कोण आहे वेतोबा?
वेतोबा हा आरवली गावातला ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. श्री देव वेतोबा केवळ आरवली पंचक्रोशीत नव्हे तर उभ्या दक्षिण कोकणचा पालक, रक्षक आणि संकट निवारक असून गेले अनेक पिढ्या भाविक जनतेचे श्रध्दास्थान आहे. संकटसमयी भक्ताच्या हाकेवर धावून जात संकट निवारण करणारा देव म्हणजे वेतोबा. वेतोबा हा नवसाला पाहणारा देव म्हणूनही ओळखला जातो. वेंगुर्ले-शिरोडा-रेडी रस्त्यावर आरवली येथे श्रीदेव वेतोबाचे पुरातन देवस्थान आहे.
अगदी रस्त्यावरुनच श्रीदेव वेतोबाचे दर्शन घडते. वेतोबाची मूर्ती भव्य मानवाकृती असून मुर्तीवर असलेल्या झुपकेदार मिश्या लक्ष वेधून घेतात. वेतोबाचे मंदिर प्रशस्त व दुमजली असून सुमारे दोन हजार लोक सामावू शकतील इतकी या मंदिरची भव्यता आहे. वेतोबाला केळ्याच्या घडाचा नैवेद्य देतात तर भल्या मोठ्या चामड्याच्या चपलांच्या जोडांचा नवस बोलतात.
आता रक्षणकर्ता वेतोबा मालिकेतून वेतोबाची हि अनोखी कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत वेतोबाची भूमिका कोणता अभिनेता साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. या मालिकेची रिलीज डेट अजून समोर आली नसली तरीही लवकरच हि मालिका सोनी मराठीवर सुरु होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.