Lee Sang Eun Death: परफॉर्मन्सच्या आधीच गायिकेचं निधन, वॉशरुममध्ये सापडला मृतदेह

दक्षिण कोरियाचा गायक ली संग युन यांचा मृत्यू झाला
Korean singer Lee Sang Eun found dead in bathroom ahead of her performance
Korean singer Lee Sang Eun found dead in bathroom ahead of her performanceSAKAL
Updated on

Lee Sang Eun Death: प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या सभागृहात सादरीकरणाच्या तयारीत असताना दक्षिण कोरियाचा गायक ली संग युन यांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकून गायकाच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिडीया रिपोर्टनुसार परफॉर्मन्सच्या काही मिनिटांपूर्वी गायिकेचा मृतदेह महिलांच्या शौचालयात सापडला होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

(Korean singer Lee Sang Eun found dead in bathroom ahead of her performance)

वृत्तानुसार, कार्यक्रमाच्या एका कर्मचार्‍याने सुरुवातीला ली ला पाहीलं आणि ती मृतावस्थेत आढळली. काही वेळातच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर तपास सुरू झाला. कर्मचार्‍यांच्या मते,

लीला परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर यायचे होते पण ती स्टेजवर नव्हती. शोध घेतला असता ती वॉशरूममध्ये आढळून आली. ती जमिनीवर पडली होती.

Korean singer Lee Sang Eun found dead in bathroom ahead of her performance
Mahesh Manjrekar: माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल तर.. महेश मांजरेकरांच्या विधानाची एकच चर्चा

वृत्तानुसार, एका कार्यक्रमाच्या कर्मचार्‍याने प्रथम लीचा मृतदेह पाहिला आणि तो मृतावस्थेत आढळला. काही वेळातच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, त्यानंतर तपास सुरू झाला.

कर्मचार्‍यांच्या मते, लीला परफॉर्म करण्यासाठी स्टेजवर यायचे होते पण ती स्टेजवर नव्हती. शोध घेतला असता ती वॉशरूममध्ये आढळून आली. ती जमिनीवर पडली होती.

मृत्यूचे खरे कारण अद्याप समोर आले नसून तपास सुरू आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता यात कोणताही कट नसून हे प्रकरण आकस्मिक मृत्यूचे असल्याचे दिसते. आता मृत्यूचे कारण काय हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळेल.

Korean singer Lee Sang Eun found dead in bathroom ahead of her performance
Mithun Chakraborty Mother: मिथुन चक्रवर्तींना मातृशोक! आई शांतीराणी चक्रवर्ती यांचे निधन

ली सॉन्ग युनबद्दल सांगायचं झालं तर, ती एक लोकप्रिय कोरियन गायिका होती. तिने सोल नॅशनल युनिव्हर्सिटीमधून डीग्री संपादन केली,

त्यानंतर त्याने न्यूयॉर्कमधील मॅनेस स्कूल ऑफ म्युझिकमधून पदव्युत्तर डीग्री प्राप्त केली. त्यांची गाणी रसिकांमध्ये खूप लोकप्रिय होती.

सिंगर ली 46 वर्षांची होती आणि ती गाण्यासोबतच गीतकार म्हणुनही ओळखली जात होती. ती एक सोप्रानो गायिका होती, जी कोरियन देशांमध्ये गायनाची लोकप्रिय शैली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.