Kota Factory 2 Review: जीतू भैय्या की बातही कुछ और है!

कोटा फॅक्टरीचा पहिला भाग ज्यावेळी प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्या.
Kota Factory 2 Review:  जीतू भैय्या की बातही कुछ और है!
Updated on

कोटा फॅक्टरीचा पहिला भाग ज्यावेळी प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्या. तरुणाईच्या मनातला विश्वास त्यावेळी या मालिकेनं आपल्या कलाकृतीतून व्यक्त केला होता. स्पर्धा परिक्षा हा सध्या देशभरातील तरुणाईच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. याच धर्तीवर काही महिन्यांपूर्वी द अॅस्पिरंट्स नावाची मालिकाही आली होती. त्यालाही लाखोच्या संख्येनं व्हयुज मिळाले होते. लक्षवेधी कथानक, बोलके संवाद, प्रभावी छायाचित्रण, आणि बांधेसुद्द पटकथा याच्या जोरावर कोटा फॅक्टरीतल्या प्रत्येक पात्रानं लक्ष वेधून घेतलं होतं. आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्या मालिकेचा दुसरा सीझन प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी त्या मालिकेकडून ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या. त्याला या सीरिजनं न्याय दिल्याचे दिसून आले आहे.

कोट्यामध्ये स्पर्धा परिक्षा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे आपल्याला पहिल्या भागामध्ये पाहायला मिळाले होते. त्या शहरामध्ये स्पर्धा परिक्षेचे वातावरण कसे आहे. प्रत्येक गोष्ट स्पर्धा परिक्षेशी कशाप्रकारे जोडली गेली आहे. हेही मोठ्या खुबीनं दाखविण्यात आले आहे. 2019 मध्ये युट्युबवर या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. त्याची कमालीची लोकप्रियता लक्षात घेऊन नेटफ्लिक्सच्या वतीनं त्यांचा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्या पहिल्या भागाला देखील 8 पेक्षा जास्त रेटिंग होती. राजस्थानमधील कोट्यामध्ये जे विद्यार्थी स्पर्धा परिक्षा आणि आयआयटीची तयारी करतात त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाशझोत या मालिकेनं टाकला. तो विद्यार्थ्यांना एवढा भावला होता की, त्याच्या दुसऱ्या भागाची गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रतिक्षा करत होते. दुसऱ्या भागामध्ये विद्यार्थ्यांना माहिती पडते की, त्यांचे आवडते शिक्षक जीतु भैय्या यांनी ते ट्युशन सेंटर सोडले आहे. अशावेळी जितेंद्र कुमार यांनी स्वताचे कोचिंग सेंटर सुरु केलं आहे.

अशावेळी विद्यार्थी कशाप्रकारे आपल्या परिक्षेची तयारी करतात, यावेळी त्यांना कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं, हे दिग्दर्शकानं प्रभावीपणे मांडलं आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाबाबत सांगायचं झाल्यास, त्यांनी सुंदरपणे त्या त्या भूमिका साकारल्या आहेत. प्रत्येकानं आपल्या भूमिकेल्या न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात ते यशस्वी झाले आहे. मयूरचा संघर्ष हा दिवसेंदिवस वाढतो आहे. तेव्हा प्रेक्षक कमालीचा अस्वस्थ होतो. मयुरनं देखील त्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याच्या क्रश विषयी दिग्दर्शकानं पेरलेले प्रसंग प्रेक्षकांची दाद मिळवून जातात.

दिग्दर्शक राघव सुब्बु यांनी आपल्या नावाची वेगळी ओळख या मालिकेच्या माध्यमातून तयार केली आहे. त्यांनी स्क्रिनवर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं विचार केला आहे. त्यामुळे ही मालिका आपल्याला अधिक प्रभावी वाटते आणि भावतेही. जगातील जीवघेणी स्पर्धा, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष यासगळ्यात आपण आपला मुळ स्वभाव हरवून बसतो. आपल्याला नेमकं काय हवं आहे हे कळण्याअगोदरच बऱ्याचशा गोष्टी हातातून निसटतात. हे दाखवताना दिग्दर्शकानं केलेली मेहनत प्रभावी ठरली आहे. ज्यांनी पहिला भाग पाहिला असेल त्यांच्यासाठी दुसरा भाग ही देखील आगळी वेगळी मेजवानी ठरेल यात शंका नाही. कोटा फॅक्टरीनं वेगळी ओळख तयार केली आहे. हे यानिमित्तानं आवर्जुन सांगावे लागेल.

Kota Factory 2 Review:  जीतू भैय्या की बातही कुछ और है!
'मायबाप आहात ना, मग पोसायला‌ थोडं सोसा की': अभिनेता आस्तादची खंत
Kota Factory 2 Review:  जीतू भैय्या की बातही कुछ और है!
'सांस्कृतिक खातं अस्तित्वात आहे का?': नाट्यगृहांचा प्रश्न ऐरणीवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.