Kota Factory 2 teaser: प्रेक्षकांचा लाडका 'जीतू भैय्या' परत येतोय..

आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल यांभोवती सीरिजची कथा फिरते.
jitendra kumar
jitendra kumar
Updated on

देशभरातील लाखो विद्यार्थी आयआयटी परीक्षा देण्यासाठी अथक मेहनत घेत असतात. 'द व्हायरल फिव्हर'ने (TVF) अनअकॅडमीच्या सहयोगाने 'कोटा फॅक्टरी' Kota Factory ही समकालीन सीरिज २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. आयआयटीची तयारी करणारे विद्यार्थी, कोचिंग सेंटर आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात घडणारे बदल यांभोवती फिरणारी या सीरिजची कथा होती. प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या या सीरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रदर्शित होणार आहे. या दुसऱ्या सिझनचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी नेटफ्लिक्सवर हा नवीन सिझन प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ज्यांनी या सीरिजचा पहिला सिझन अद्याप पाहिला नसेल, त्यांच्यासाठी पहिला सिझनसुद्धा नेटफ्लिक्सवर Netflix नुकताच दाखल झाला आहे.

नव्या सिझनमध्येही वैभव, बालमुकुंद आणि उदय यांच्या भूमिका पहायला मिळतात. टीझरच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांचे सर्वांत आवडते शिक्षक जीतू भैय्या (जितेंद्र कुमार) कोचिंग सेंटर सोडल्याचं कळतं. यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसतो. आयआयटी प्रवेशासाठी आपण इतके प्रयत्न का करतोय आणि हे खरंच आपल्याला हवं का, अशा द्विधा मनस्थितीत वैभव आहे. अशा वेळी जीतू भैय्या एक मार्गदर्शक म्हणून पडद्यावर येतो.

jitendra kumar
मुंबईत आजही मी भाड्याच्या घरात राहतो- अनुपम खेर

"कोटामधील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि त्यांच्या रोजच्या जीवनातील संघर्ष या दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळेल. सीरिजची कथा आणि कलाकारांचं दमदार सादरीकरण यांमुळे प्रेक्षकांना दुसरं सिझनसुद्धा नक्कीच आवडेल", असा विश्वास दिग्दर्शक राघव सुब्बु यांनी व्यक्त केला. या सीरिजमध्ये जीतूची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र हा खऱ्या आयुष्यातसुद्धा कोटाचा विद्यार्थी होता. या भूमिकेमुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. येत्या २४ सप्टेंबर रोजी हा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.