'शाब्बास शेरा' म्हणत क्रांतीने केलं समीर वानखेडेंचं कौतुक

जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?
Sameer Wankhede Kranti Redkar
Sameer Wankhede Kranti Redkar
Updated on

अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एसीबी) सहार कार्गोच्या आंतरराष्ट्रीय कुरियर टर्मिनसवर कुरियरमधून ७०० ग्रॅम हेरॉईन जप्त केलं असून त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. एनसीबी आणि पती समीर वानखेडेंच्या Sameer Wankhede या कामगिरीचं कौतुक करत अभिनेत्री क्रांती रेडकरने Kranti Redkar 'शाब्बास शेरा' असं लिहिलं आहे. क्रांतीचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्रांतीच्या या ट्विटवर कमेंट करत नेटकऱ्यांनीही एनसीबीच्या कामाचं कौतुक केलं आहे.

सहार कार्गोच्या आंतरराष्ट्रीय कुरियर टर्मिनसवरील सभागृहात १ नोव्हेंबरला एनसीबीकडून ही कारवाई करण्यात आली. त्यात एका कुरियरमध्ये ७०० ग्रॅम पांढऱ्या रंगाची पूड जप्त करण्यात आली. तपासणीत ते हेरॉईन असल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी गुजरातमधील एका व्यक्तीची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या प्रकरणाचे लांगेबांधे दक्षिण आफ्रिकेशी जोडले असून त्याच्या तस्करीत परदेशी विक्रेत्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

Sameer Wankhede Kranti Redkar
अखेर केएल राहुलने अथियाच्या प्रेमाची दिली जाहीर कबुली

दुसरीकडे समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. एनसीबीच्या दिल्लीतील पथकाकडे आर्यन खानसह आणखी पाच प्रकरणांचा तपास वर्ग करण्यात आला आहे. "मुंबई विभागाकडील सहा प्रकरणांचा तपास दिल्लीतील पथकाकडे सोपवला आहे. हा प्रशासकीय निर्णय आहे", अशी प्रतिक्रिया एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.