एखादी समस्या सतावत असेल किंवा एखादा निर्णय घेण्याबाबत मनात संभ्रम असेल तर वानखेडे या व्यक्तीचा सल्ला घेतात.
केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे Wankhede त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सध्या चर्चेत आहेत. वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली. वानखेडे यांची पोस्टिंग ज्या ज्या विभागात झाली, तिथे त्यांनी चोख कामगिरी केली. सीमाशुल्क विभागात काम करत असतानाही त्यांनी अनेक सेलिब्रिटींना परकीय चलनात खरेदी केलेल्या सामानाची माहिती उघड केल्याशिवाय आणि त्यावरील योग्य तो कर भरल्याशिवाय कस्टमची मंजुरी दिली नव्हती. त्यांच्या या कामामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांची ओळख 'सिंघम' अधिकारी म्हणून बनली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांची पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरने त्यांच्या करिअरमागे असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तीचा खुलासा केला.
'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत क्रांती म्हणाली, "समीर तणावाखालीसुद्धा चोख काम करू शकतो. त्याला त्या गोष्टींची सवय आहे. आपल्या ऐतिहासिक नेत्यांचा आदर्श त्याने समोर ठेवला आहे. त्यांच्या इतिहासाशी तो खूप जोडलेला आहे. विविध जागतिक नेत्यांच्या कामगिरीबाबत वाचून तो मोठा झाला आहे."
"समीरचे वडील ज्ञानदेव वानखेडे हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. एखादी समस्या त्याला सतावत असेल किंवा एखादा निर्णय घेण्याबाबत त्याच्या मनात संभ्रम असेल तर तो त्याच्या वडिलांशी संपर्क साधतो. त्याचे वडील हे त्याच्या कारकिर्दीत एखाद्या मार्गदर्शक प्रकाशासारखे आहेत", असं क्रांती पुढे म्हणाली.
क्रांती आणि समीर यांना तीन वर्षांची जुळी मुलं आहेत. याआधी दिलेल्या एका मुलाखतीत क्रांतीने समीरच्या कामाचं कौतुक केलं होतं. "कुटुंबीयांची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी मी घरी आहे, त्यामुळे तो निश्चिंत आहे. देशासाठी तो त्याचं वैयक्तिक आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतोय, मला त्याच्यावर खूप अभिमान आहे. जो जसा आहे तसाच मला आवडतो आणि मी त्याच्या कामाचा खूप आदर करते", अशा शब्दांत क्रांतीने भावना व्यक्त केल्या होत्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.