Sameer Wankhede Video: नवऱ्याच्या बचावासाठी कसली कंबर, क्रांतीचा नवा व्हिडीओ पाहून सर्वांचे धाबे दणाणले

आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडेंची कसून चौकशी केलीय
kranti redkar, sameer wankhede, kranti redkar viral video
kranti redkar, sameer wankhede, kranti redkar viral videoSAKAL
Updated on

Kranti Redkar New Video on Sameer Wankhede News: आर्यन खान ड्रेस प्रकरणी समीर वानखेडे यांच्यावर सध्या चौकशी चालू आहे.

बेहिशोबी मालमत्ता आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणाबरोबरच आर्यन खानची सुटका करण्यासाठी २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडेंची कसून चौकशी केलीय.

समीर वानखेडेंवर निलंबनाची कारवाई होणार का? असाही प्रश्न मध्यंतरी निर्माण झाला होता. क्रांती रेडकर या सर्व प्रकरणानंतर नकळत सोशल मीडियावर पोस्ट करत अशातच क्रांती रेडकरने एक नवीन व्हिडिओ शेयर केलाय.

kranti redkar, sameer wankhede, kranti redkar viral video
Salman Khan Video: आज सलमानला कळलं असेल बाप होणं म्हणजे काय.. एअरपोर्टवरचा व्हिडीओ व्हायरल

क्रांती रेडकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत क्रांतीने NCB अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांनी याआधी ज्या कारवाई केल्या आहेत त्यांचे एकत्रित फोटो लोकांना दाखवत एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत समीर वानखेडे यांनी यापूर्वी केलेल्या कारवाई दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अल्पवधीतच व्हायरल झालाय.

kranti redkar, sameer wankhede, kranti redkar viral video
Man Jhala Bajind: मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेत्रीच्या पतीचे दु:खद निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

क्रांतीने हा व्हिडिओ शेयर करत त्याखाली कॅप्शन दिलंय की.. देशाची सेवा करण्यासाठी तुम्ही तुमचा सर्वोत्कृष्ट वेळ आणि शक्ती कामी आणा आणि त्याचा योग्य उपयोग करा.

अशी पोस्ट क्रांतीने लिहिली आहे. क्रांतीने पती समीर वानखेडेची बाजू मांडत त्यांच्या पाठीशी पत्नी म्हणून खंबीरपणे उभी आहे, हेच नकळत सांगितलं आहे.

आता त्यातच समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने कुणाचंही नाव न घेता तिच्या नवऱ्याविरुद्ध होणाऱ्या कारवाईबद्दल भाष्य केले आहे.

याआधीही क्रांती पतीवर लावण्यात आलेले सारेच आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणावर सविस्तर बोलतांना क्रांती म्हणाली होती की,

“त्यांच्याविरोधातील सर्व आरोप खोटे आहेत, हे प्रत्येकाला माहित आहे. हे फक्त आरोप आहेत आणि आम्ही सीबीआयच्या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहोत.

आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करतोय”.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()