Janmashtami 2022: सलमान खानच्या बजरंगी भाईजानमध्ये मुन्नीची भूमिका करणाऱ्या हर्षालीनं सोशल मीडियावर वेगळी ओळख (Bollywood News) तयार केली आहे. तिचा फॅनक्लबही मोठा आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेयर करुन ती नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष (Bollywood Actress) वेधून घेताना दिसत असते. कृष्णजन्माष्टमीच्या (viral entertainment news) निमित्तानं हर्षालीनं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसादही मिळाला आहे. जन्माष्टमी साजरी करताना हर्षालीनं चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट दिली आहे.
साऱ्या देशात कृष्ण जन्माष्टमीचा माहोल असताना त्यात वेगवेगळ्या बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील आनंदोत्सव साजरा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर कृष्णजन्माष्टमीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यासगळ्यात सलमान खानच्या बजरंगी भाईजानमध्ये मुन्नीची भूमिका करणाऱ्या हर्षालीचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यात तिनं कृष्णाच्या भजनावर डान्स करत चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहे. त्यावर तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. हर्षाली ही नेहमीच तिच्या व्हिडिओ आणि फोटोंनी चाहत्यांची पसंती मिळवत असते.
'श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी' या गाण्यावर हर्षांलीनं नृत्य केलं आहे. तिनं पिंक कलरचा सुट परिधान केला आहे. तिचं नृत्यकौशल्य पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. हर्षालीच्या व्हिडिओला नेहमीच उस्फुर्त प्रतिसाद मिळतो. तिनं तो व्हिडिओ शेयर करताना लिहिलं आहे की, 'श्री कृष्ण गोविंद, हरे मुरारी,हे नाथ नारायण वासुदेवः, जन्माष्मीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटसची बरसात केली आहे. एकानं लिहिलं आहे की, खूपच छान व्हिडिओ आहे. तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, हर्षाली एक दिवस तू खूप मोठी अभिनेत्री होशील यात वाद नाही. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या व्हिडिओला 40 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.