Adipurush: 'आदिपुरुष'साठी क्रिती नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती..

Adipurush Actress Kriti Sanon
Adipurush Actress Kriti SanonEsakal
Updated on

अखेर बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर प्रसिद्ध अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.

चर्चेत असलेला 'आदिपुरुष' हा चित्रपट कोणत्या ना कोणत्या कारणा वरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. कधी ड्रेसिंग तर कधी डायलॉग या कारणावरुन हा चित्रपट चर्चेत असून या विषयी आणखी एक गोष्ट समोर आली आहे.

'आदिपुरुष' सिनेमात जानकी या पात्रासाठी कृती सेनन ही अभिनेत्री पहिली पसंती नव्हती. तिच्या आधी तीन अभिनेत्रींना या पात्रासाठी विचारण्यात आले होते. यातील दोन अभिनेत्री बॉलीवुडमधील आहेत.

Adipurush Actress Kriti Sanon
Cannes Film Festival यंदा गाजवला मराठी माणसानं.. अशोक राणेंना 'सत्यजित रे स्मृती' पुरस्कार

गीत रामायण वर आधारित हा चित्रपट ओम राऊत ने डायरेक्ट केलेला असून या चित्रपटात रामाच्या भूमिकेत बाहुबली फेम प्रभास तर जानकीच्या भूमिकेत कृती सेनेनला घेण्यात आले आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का? सीतेच्या पात्रासाठी कृती सेननच्या आधी कीर्ती सुरेश ही पहिली पसंती होती. किर्ती सुरेश ही तेलगू चित्रपटातील नावाजलेली अभिनेत्री आहे. ती रजनीकांत सोबत चित्रपट करत असल्याने तिने आदिपुरुष सिनेमासाठी नकार दिला होता.

Adipurush Actress Kriti Sanon
International Short Film Festival : मुंबईत आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव संपन्न

त्यानंतर अनुष्का शेट्टी आणि अनुष्का शर्मा यांना देखील या सिनेमासाठी विचारण्यात आले होते. परंतु त्यांनी देखील या सिनेमासाठी नकार दिला. शेवटी हा सिनेमा कृती सेननच्या पदरात पडला.

तिने सीतेची भूमिका चांगली निभावली आहे. हा सिनेमा जरी वादाच्या भोवऱ्यात असला तरी कृती सेनेनचा जानकी माईचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटामुळे कृतीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.