जामीन मिळाल्यानंतर केआरके पुन्हा सक्रिय; म्हणाला - बदला घेण्यासाठी परत आलो!

जामीन मिळाल्यानंतर केआरके पुन्हा सक्रिय झाला आहे.
KRK After Bail
KRK After Bailesakal
Updated on

KRK Active After Bail : अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ट्विटरवर परतला आहे. काही दिवसांपूर्वी केआरकेला (KRK) त्याच्या जुन्या ट्विटच्या संदर्भात मुंबई (Mumbai) विमानतळावरून पोलिसांनी अटक केले होते.

त्याला जामीन मिळाले आहे. सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या केआरकेने रविवारी सोशल मीडियावरही धमाकेदार पुनरागमन केले. अटक झाल्यानंतर केआरकेने पहिल्यांदाच ट्विट केले आहे.

KRK After Bail
Kangana Ranaut : 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईतील ७० टक्के आकडे खोटे, कंगनाचा दावा

'मी माझ्या अटकेचा बदला घेण्यासाठी...

३० ऑगस्ट रोजी केआरकेला मुंबई पोलिसांनी २०२० मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटवरून अटक केली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर केआरके पुन्हा आपल्या स्टाईलमध्ये परतला आहे. केआरकेने ट्विट करून विरोधकांसाठी एक घोषणा केली आहे.

'मी माझा बदला घेण्यासाठी परत आलो आहे,' असे केआरकेने ट्विटमध्ये लिहिले आहे. केआरकेच्या या ट्विटनंतर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, 'ब्रह्मास्त्र'च्या समीक्षाची वाट पाहत आहे. दुसऱ्याने लिहिले, पूर्ण स्वागत ! (Bollywood News)

केआरकेला दोन वेगळ्या ट्विटसाठी अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल कथित अपमानास्पद ट्विटचे प्रकरण आणि २०२१ मध्ये वर्सोवा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

KRK After Bail
Brahmastra : दुसऱ्या दिवशी ब्रह्मास्त्रच्या कमाईत वाढ, १०० कोटींचा टप्पा...

विनयभंगाच्या प्रकरणात, केआरकेने अशोक सरोगी आणि जय यादव या वकीलांमार्फत वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात, एफआयआरमधील माहिती विनयभंगाच्या घटनेशी व्यावहारिकपणे जुळत नसल्याचा दावा केला.

घटनेच्या १८ महिन्यांनंतर एफआयआर नोंदवण्यात आला आणि तोही पीडितेच्या मित्राने करण्यास सांगितल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची वस्तुस्थिती वकील यादव यांनी न्यायालयासमोर मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.