KRK Tweet: 'कोऱ्या कागदावर लिहून देतो की..', 'गदर 2' च्या रिलीजआधीच केआरके नं केलेलं भाकित हैराण करणारं

स्वघोषित समिक्षक केआरके ने 'गदर 2' बॉक्सऑफिसवर किती कमावणार तो आकडाच जाहीर केला आहे.
KRK Tweet on Gadar 2 Movie
KRK Tweet on Gadar 2 MovieGoogle
Updated on

KRK Tweet: स्वतःला प्रसिद्ध समिक्षक म्हणवणारा कमाल रशिद खान उर्फ केआरके नेहमीच बॉलीवूड सिनेमांवर,कलाकारांवर ताशेरे ओढताना दिसतो. तो प्रत्येक सिनेमावर मत मांडताना दिसतो..सिनेमा चालणार की नाही याविषयी भाकितही करतो.

आता केआरकेनं सनी देओलच्या बहुप्रतिक्षित 'गदर २' सिनेमाच्या बॉक्सऑफिस कलेक्शनविषयी भाकित केलं आहे. तारा सिंग आणि सकिनाच्या जोडीचा सिनेमा हिट ठरणार की फ्लॉप याविषयी त्यानं भाष्य केलं आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेलच्या 'गदर २' सिनेमाचा टीझर रिलीज केला गेला आहे. जो पाहिल्यानंतर सिनेमाविषयी उत्सुकता वाढलेली दिसत आहे. पण यादरम्यानं आता केआरकेनं सिनेमाच्या रिलीज आधीच आपलं ज्ञान पाजळलं आहे. (KRK Predicts sunny deol gadar 2 box office collection tweet viral)

KRK Tweet on Gadar 2 Movie
Taapsee Pannu: अभिनेत्री तापसी पन्नू विरोधात FIR ची मागणी..जाणून घ्या प्रकरण

केआरकेनं ट्वीट केलं आहे की,''कृपया इकडे लक्ष द्या..शरिक पटेल आणि झी टीमच्या मते 'गदर २' सिनेमा २०० करोडचा बिझनेस बॉक्सऑफिसवर करेल.पण मी कोऱ्या कागदावर लिहून देतो की १५ करोडपेक्षा एक रुपया हा सिनेमा कमावणार नाही.तेव्हा आता हिंदी सिनेमाच्या निर्मितीबाबत असलेलं कॉर्पोरेट अधिकाऱ्यांचे ज्ञान तुम्हाला समजले असेलच''.

KRK Tweet on Gadar 2 Movie
Bheed Movie Intimate Scene: दिग्दर्शकानं भूमीला शूटआधी असा समजावला होता इंटीमेट सीन..'भीड' सिनेमा नाही पण सीन मात्र त्यामुळे गाजतोय..

गदर २ हा सिनेमा ११ ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सिनेमात तारा सिंगचा मुलगा जीते आता मोठा झालेला दाखवला आहे. त्याला वाचवण्यासाठी तारा सिंग आता पाकिस्तानात जाणार आहे.

यावेळी सिनेमात तारा सिंगचा मित्र दरमियान सिंगची भूमिका साकारताना विवेक शौक दिसणार नाही. कारण त्यांचे निधन झाले आहे. त्यांचे निधन २०११ साली हार्ट अटॅकमुळे झाले होते.

तर सिनेमात न्यूजपेपर एडिटरची व्यक्तिरेखा साकारताना दिसलेले मिथलेश चतुर्वेदी यांना देखील 'गदर २' मध्ये आपण मिस करणार आहोत. त्यांचे निधन गेल्याच वर्षी झाले आहे.

याव्यतिरिक्त ओम पुरी ज्यांनी सिनेमाचं नरेशन दिलं होतं ते देखील आता आपल्यात नाहीत. त्यांचे निधनही २०१७ साली झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.