Kshitij Patwardhan: "महाराष्ट्रात घडणारा हिंदी सिनेमा करायचा आहे." ताली लिहीणाऱ्या मराठी लेखकाची पोस्ट चर्चेत

क्षितीजने रवी जाधव दिग्दर्शित ताली वेबसिरीजचं लेखन केलंय
kshitij patwardhan viral post on made marathi based hindi movie in maharashtra
kshitij patwardhan viral post on made marathi based hindi movie in maharashtraEsakal

सुष्मिता सेनची प्रमुख भुमिका असलेली ताली ही वेबसिरीज प्रचंड लोकप्रिय झाली. मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. तर लेखक क्षितीज पटवर्धनने तालीचं लेखन केलंय.

क्षितीज पटवर्धन सोशल मिडीयावर चांगलाच सक्रीय आहे. अशातच क्षितीजची पटकथा आणि संवाद असलेला सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ हा हिंदी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. यानिमित्ताने क्षितीजने एक खास पोस्ट लिहीलीय जी चर्चेत आहे.

(kshitij patwardhan viral post on made marathi based hindi movie in maharashtra)

kshitij patwardhan viral post on made marathi based hindi movie in maharashtra
Vaishali Shinde: आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज हरपला! गायिका वैशाली शिंदे यांचं निधन

सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ या सिनेमाचा दिग्दर्शक मिखिल मुसळेचा फोटो शेअर करत क्षितीजने लिहीलंय की, "मला महाराष्ट्रात घडणारा हिंदी सिनेमा करायचा आहे." मिखील मुसळे या मराठी नावाच्या पण गुजरात मध्ये वाढलेल्या दिग्दर्शकाने दोन वर्षापूर्वी जेव्हा सांगितलं तेव्हा मी म्हणालो "का?" त्याने ठामपणे सांगितलं की "मराठी माणसं, संस्कृती आणि समाज हा माझ्या जगण्याचा भाग आहे, तो माझ्या सिनेमाचा ही भाग असला पाहिजे!" मला कौतुक वाटलं आणि मी लेखन प्रक्रियेत सहभागी झालो. (Latest Marathi News)

क्षितीज पुढे लिहीतो, "दोन अडीच वर्ष writers room मध्ये जीव तोडून काम, Maddock सारख्या निर्मिती संस्थेत आणि पर्यायाने हिंदी चित्रपटसृष्टीत मिळालेला प्रवेश, जवळपास ३०-३१ वेळा हिंदी मध्ये वाचन, विविध नावाजलेल्या कलाकारांशी झालेल्या भेटी गाठी आणि आयुष्यभरासाठी जोडलेले मीखील, शारदा, परिंदा आणि अनु यासारखे मित्र! सजनी शिंदे ने मला खूप काही दिलं, पण सगळ्यात महत्वाचं दिला आत्मविश्वास, भाषेच्या पलीकडे जाऊन लिखाणावर काम करण्याची ऊर्मी आणि न लाजता न बुजता स्वतःचं म्हणणं मांडण्याची शक्ती. माझ्यातला भाबडेपणा कमी करायला ह्या सिनेमाची फार मदत झालीय." (Latest Marathi News)

क्षितीज शेवटी सांगतो, "ह्याच दिग्दर्शक मित्रामुळे Maddock मध्ये पुढचा ही सिनेमा मिळाला जो लवकरच येईल आणि त्यानेच माझं नाव सिंघम साठी सुचवलं. मिखिल, ही पोस्ट तुझ्या वेडेपणा साठी, सिनेमा वरच्या प्रेमासाठी, आणि लेखकांच्या मागे हक्काने उभं राहायचं ह्या स्पिरीट साठी!"

अशी पोस्ट लिहून क्षितीजने प्रेक्षकांना सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ सिनेमा पाहण्याचं आवाहन केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com