कुमार गौरवला करिअरमधील 'या' चुका पडल्या महागात, आता सांभाळतो मोठा उद्योग

'देखो मैंने देखा है एक सपना, छोटे से शहर मे हो घर अपना' हे गाणे ऐकताच...
Kumar Gaurav
Kumar Gaurav esakal
Updated on

'देखो मैंने देखा है एक सपना, छोटे से शहर मे हो घर अपना' हे गाणे ऐकताच डोळ्यासमोर कुमार गौरवचा चेहरा येतो. १९८१ मध्ये आलेला चित्रपट 'लव स्टोरी' मधील हे गाणे आहे. या चित्रपटातूनच कुमार गौरवने बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले होते. एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेते राहिलेले राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरवला (Kumar Gaurav) या चित्रपटाने मोठा स्टार बनवला होता. चित्रपटात त्यांची सहकलाकार होती विजयता पंडित. बाॅलीवूडमधील (Bollywood) दणकेबाज पदार्पणानंतर कुमार गौरवने अनेक चित्रपट केली. मात्र म्हणावे असे यश मिळू शकले नाही आणि पाहाता-पाहाता तो चित्रपटांमधून गायब झाले. ११ जुलै रोजी कुमार गौरवच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या विषयी सांगणार आहोत.. (Kumar Gaurav Birthday Know About All This Bollywood Actor)

Kumar Gaurav
सलमानने माफी मागावी अन्यथा.. ; गँगस्टरची पोलिसांसमोरच धमकी

१९८१ मधील 'लव स्टोरी'मुळे कुमार गौरव बनला स्टार

कुमार गौरवने १९८१ मधील सुपरहिट पदार्पणानंतर तेरी कसम, हम है लाजवाब, दिल तुझको दिया, आज, गुंज आणि प्रतिज्ञाबध या सारखी चित्रपट केली. मात्र यात यश मिळू शकले नाही. नवीन अभिनेत्रींबरोबर काम करण्यास नकार दिल्यामुळे हे घडल्याचे सांगितले जाते. वास्तविक जेव्हा कुमार गौरव 'लव स्टोरी'चे चित्रीकरण करत होते, तेव्हा त्यावेळी अभिनेत्री मंदाकिनीही चित्रपटांमध्येही पाऊल ठेवत होती.

Kumar Gaurav
शाहरुखचा मुलासह दिसला वेगळा अंदाज, ईदच्या दिल्या शुभेच्छा !

मंदाकिनीसह नवीन अभिनेत्रींबरोबर काम करण्यास नकार

मंदाकिनीने राज कपूरचा चित्रपट राम तेरी 'गंगा मैली'मधून बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र चित्रपटापूर्वीच त्यांनी 'शिरीन फरहाद'साठी करारबद्ध केले होते. हिच मंदाकिनीची डेब्यू फिल्म होणार होती. 'शिरीन फरहाद'मध्ये निर्माता दिनेश बन्सलने मंदाकिनीसह कुमार गौरवला करारबद्ध करु इच्छित होते. त्यावेळी कुमार गौरव 'लव स्टोरी' त बिझी होता. त्यामुळे दिनेश बन्सल आणि मंदाकिनीने कुमार गौरवच्या डेब्यू चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतिक्षा करणे योग्य समजले.

Kumar Gaurav
अमिताभ आणि शाहरुख पुन्हा एकत्र.. 'त्या' फोटोमुळे डॉन ३ ची जोरदार चर्चा..

बांधकाम आणि ट्रॅव्हल बिझनेस सांभाळतात कुमार गौरव

कुमार गौरव हळूहळू दिसनासे झाले. त्याचा शेवटचा चित्रपट कांटे २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. आज कुमार गौरव एक यशस्वी व्यावसायिक आहेत. मात्र चित्रपट विश्वापासून दूर आहेत. कुमार गौरवचा मालदीवमध्ये ट्रॅव्हल बिझनेस आहे आणि वो कंस्ट्रक्शनच्या व्यवसायातही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.