Kunal Kamra: 'मी जय श्री सीता राम म्हणतो, तुम्ही नथुराम मुर्दाबाद म्हणा!'

कॉमेडियन कुणाल कामराच्या शो वर बंदी घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केली होती.
Kunal Kamra vishwa hindu parishad news
Kunal Kamra vishwa hindu parishad news esakal
Updated on

Kunal Kamra Commedian trolled : कॉमेडियन कुणाल कामराच्या शो वर बंदी घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं केली होती. हरियाणातील गुरगावमध्ये त्याचा कार्यक्रम होणार होता. त्याची मोठी चर्चाही झाली (social media viral news) होती. मात्र स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी विहिपनं केली होती. त्यावर कुणालनं चिडून व्टिट करुन नथुराम गोडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. त्यावरुन तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता त्यानं आपल्यावर टीका करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

मी तुमच्या नावासमोर मुद्दाम विश्व असे लिहिले नाही. याचे कारण मला वाटत नाही तुम्हाला हिंदूंची कुणी ठेकेदारी दिलेली आहे. ते तुम्ही स्वताहून केले आहे. त्यामुळे काही गोष्ट नाही. तुम्ही मला धमक्या देऊन आणि प्रशासनावर दबाव आणून माझा शो कॅन्सल केला. असे मला कळले. ज्याठिकाणी माझा कार्यक्रम होणार होता त्या सभागृहाच्या मालकाला धमकावले. त्या बिचाऱ्याचा त्यात काय दोष, पण तुम्ही तसे केले. त्याला त्याचा व्यवसाय करायचा आहे. तो ते करतो आहे. तुम्ही त्याला तो करु देत नाही. तो पोलिसांकडे जरी गेला तरी काही उपयोग होणार नाही. त्याला तुमच्याकडेच आहे. कारण तुमची व्यवस्था आहे.

तुम्ही म्हणता की मी हिंदूंचा अपमान केला, कधी केला मला सांगा. कोणतीही क्लिप अथवा माझा कोणताही शो ज्यात मी हिंदूचा अपमान केला सांगा. मी फक्त सरकारवर टीका करत असतो. तुम्ही जर सरकारी पाळीव आहात तर तुम्हाला वाईट वाटणारच. त्यामध्ये हिंदू असण्याची गोष्ट आली कुठे, असा प्रश्न कुणालनं आपल्या ट्विटच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेला विचारला आहे. माझ्यात आणि देवामध्ये जे नातं आहे त्याबाबत कोणतीही टेस्ट मला द्यायची नाही. ना की ते मला कोणत्या पुराव्यानिशी सिद्ध करायचं आहे.

Kunal Kamra vishwa hindu parishad news
Kunal Kamra: 'चार चवन्नी घोडे पे, तुम्हारा गोडसे...' कुणाल कामराचं वादग्रस्त ट्विट

आता मी एक टेस्ट तुम्हाला देतो मी जोरानं गर्व से जय श्री सीता राम आणि जय राधा कृष्ण म्हणतो तुम्ही गोडसे मुर्दाबाद असं मला लिहून पाठवा. अशा शब्दांत कुणाल कामरानं विहिप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. त्याच्या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.