Kusha Kapila ही एक नावाजलेली इन्फ्लूएन्सर आहे. ती पती जोरावर अहलुवालिया याच्यापासून वेगळं होत आहे. तिनेच इन्साग्रामवर पोस्ट करुन याबद्दल थंट सांगितलं. तिच्या या निर्णयामुळे फॅन्सला धक्का बसला आहे.
कुशा कपिला सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. काही दिवसांपूर्वी ती फिल्म फेस्टिव्हलच्या डेब्यूवरुन चर्चेत आलेली होती. आता ती वैयक्तिक आयुष्यावरुन चर्चेत आलेली आहे.
कुशाने आज एक इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने लग्नाच्या सहा वर्षांनंतर पती जोरावर सिंह अहलुवालिया याच्यापासून वेगळा होण्याचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय घेतांना आपल्याला खूप त्रास झाला असून आम्ही मिळून निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
कुशा यूट्युबर तर आहेच पण सोबतच ती एक नावाजलेली कॉमेडियन आहे. तिने २०१७ मध्ये जोरावर सिंह अहलूवालिया याच्यासोबत लग्न केलं होतं. दोघांच्या लव्ह स्टोरीची खूपच चर्चा झाली होती. दोघांनी प्रत्येक प्रसंगात एकमेकांची साथ दिली. दोघंही सोशल मीडिया हँडलवर चांगल्या-चांगल्या मजेशीर पोस्ट करत होते. आता त्यांच्या वेगळं होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे.
कुशाचे इन्स्टाग्रामवर ३.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. ती नेहमी इन्स्टाग्राम अकाऊंट आणि यूट्युबवर फनी व्हीडिओ शेअर करत असते. तिच्या फॅन्सला तिचे व्हीडिओ खूपच आवडतात. कुशा काही टीव्ही शो आणि सिनेमांमध्ये दिसलेली आहे. एवढंच नाही तर तिने काही अवार्ड फंक्शन होस्ट केलेले आहेत.
कुशा आणि जोरावर यांची भेट २०१२ मध्ये झाली होती. एका मित्राच्या लग्नात दोघे भेटले आणि त्यानंतर त्यांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केलं. २०१७ मध्ये दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. त्यातच आता दोघे वेगळे होत असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.