Kushal Badrike: ''आयुष्याच्या प्रवासात उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली की..'', लाखमोलाचं बोलला कुशल बद्रिके

कुशल बद्रिकेच्या पोस्ट या नेहमीच विचार करायला भाग पाडतात.
Kushal Badrike
Kushal BadrikeEsakal
Updated on

'चला हवा येऊ द्या' या विनोदी शो मुळे घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे देखील तितकाच चर्चेत असतो. कुशल आता विनोदी शैलीच्या पलिकडे जाऊन सिनेमात भूमिका साकारताना दिसत आहे.

त्याचा 'एक होता काऊ' हा सिनेमा त्यापैकीच एक. त्यानं भाऊ कदम सोबत 'पांडू' सिनेमातही उत्तम भूमिका साकारली होती. आताही अनेक मराठी सिनेमातून आपल्या भेटीस कुशल येत आहे. कुशल आपल्या पोस्टच्या माध्यमातून अनेक वैचारिक गोष्टी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.

नुकतीच त्यानं केलेली पोस्ट ही आयुष्यातील एक कटू सत्य सांगून गेली आहे पण लाखमोलाची गोष्ट त्यामाध्यमातून कुशल बोलून गेला आहे. चला जाणून घेऊया त्या पोस्टविषयी...(Kushal Badrike post marathi actor)

Kushal Badrike
Milind Gawali: 'शेतकरी आणि कलाकार या दोघांमध्ये मोठं साम्य..', मिलिंद गवळी बोलून गेले सौ बात की एक बात..

कुशलनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,''Struggle काळातल्या ट्रेनच्या प्रवासात, कधीकधी चुकून डुलकी लागायची, थोड्यावेळाने डोळे उघडले की आजूबाजूला वेगळीच माणसं दिसायची, खिडकीतून बाहेर डोकावलं तर वेगळेच रस्ते, वेगळ्याच बिल्डिंग्स, आणि मग लक्षात यायचं, की सालं आपण उतरायचं ”स्टेशन” तर मागेच राहून गेलं !''

Kushal Badrike
Viral Video: 'ढल गया दिन..हो गई शाम..' पी.व्ही.सिंधू सोबत बॅडमिंटन खेळताना रितेश देशमुखनं मारली बाजी..
Kushal Badrike
Madhuri Dixit: गुलजार नार ही मधुबाला..

''मग पुढल्या एखाद्या अनोळखी स्टेशनला उतरायचं, अनोळखी पाट्या, अनोळखी स्टॉल्स, अनोळखी माणसं. पण इंडिकेटर वरची “रिटर्न ट्रेन” मिळेपर्यंत, सगळं ओळखीचं होऊन जायचं.
आयुष्याचा प्रवासही थोड्याफार फरकाने असाच असतो, नाही का? आपण थांबायचं ठिकाण चुकलं की मग एका अनोळखी जगाचा प्रवास सुरू होतो….
फक्त आयुष्याच्या प्रवासात कोणत्याच इंडिकेटरला रिटर्न ट्रेन नसते. आपलं उतरायचं स्टेशन आणि माणसं एकदा चुकली, की चुकली……..''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.