Kushal Badrike: आता कृष्णाने अवतार घ्यावा... मणिपूर घटनेचा कुशल बद्रिकेकडून जाहीर निषेध

चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिकेने सोशल मिडीयावर संतप्त पोस्ट करत निषेध व्यक्त केलाय.
Kushal Badrike post on Manipur Violence publicly condemns the Manipur incident post viral
Kushal Badrike post on Manipur Violence publicly condemns the Manipur incident post viralSAKAL
Updated on

Kushal Badrike on Manipur Violence: मणिपूरमध्ये नुकताच दोन मुलींना विवस्त्र करुन त्यांच्यासोबत गैरप्रकार घडला. या घटनेने सगळा देश हादरला. या घटनेवर सगळा देश संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

अशातच मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्यात. अशातच चला हवा येऊ द्या फेम कुशल बद्रिकेने सोशल मिडीयावर संतप्त पोस्ट करत निषेध व्यक्त केलाय.

(Kushal Badrike publicly condemns the Manipur incident )

Kushal Badrike post on Manipur Violence publicly condemns the Manipur incident post viral
Vivek Agnihotri: हिम्मत असेल तर मणिपूर फाईल्स बनवुन दाखवा, विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्याचं खुलं आव्हान

कुशल लिहीतो..

कुशलने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करुन पोस्ट लिहीलीये की.. कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण लाज निघाली ती पांडवांची.…

ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे ह्याची मला प्रचंड कीव येते. मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा.

हिंसाचाराची सुरुवात कशी झाली

मणिपूरमधील अशांततेची सुरुवात ही कुकी आणि मेईतेई यांच्यातील हिंसक संघर्षाने झाली. या संघर्षांमध्ये आतापर्यंत किमान १२५ लोक मरण पावले आणि ४०,००० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

दरम्यान दोन महिलांची नग्न करून परेड केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर देशभरात निदर्शने सुरू झाली आणि संसदेत देखील या मुद्द्यावर गोंधळ उडाला.

केंद्र सरकारने मणिपूरमध्ये हजारो निमलष्करी आणि लष्करी तुकड्या तैनात केल्या आहेत, परंतु तुरळक हिंसाचार सुरूच आहे, ज्यामुळे राज्य हाय अलर्टवर आहे.

Kushal Badrike post on Manipur Violence publicly condemns the Manipur incident post viral
Swanandi Tikekar: स्वानंदीने गुपचुप उरकला साखरपुडा? मेहंदीचा रोमँटीक फोटो व्हायरल

मणिपूरमध्ये सुरक्षा तैनात

या अशांततेच्या काळात, स्थानिक पोलिस ठाण्यांकडे संसाधनांच्या कमतरतेमुळे खून आणि हल्ला यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात अडथळे येत आहेत. सूत्रांने दिलेल्या माहितीनुसार अनेक पोलिस स्टेशन मर्यादित कर्मचाऱ्यांसह कार्यरत आहेत.

त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्यांचे मुख्य लक्ष बनले आहे.दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी राज्य पोलिसांना मदत करण्यासाठी केंद्राने १३५ कंपन्या पाठवल्या आहेत. परिस्थिती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र तरीही तुरळक घटना समोर येत आहेत.एका अधिकाऱ्याने सांगितले की, मणिपूरच्या १६ जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यामध्ये अजूनही शांतता प्रस्थापित होऊ शकलेली नाहीये, त्यामुळे वेळोवेळी आम्ही फोर्स इकडून तिकडे फिरवत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.