Kuttey Review : 'कुत्ते' पाहिल्यावर तोंडातून शिव्याच बाहेर पडणार! नुसताच...

बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या विशाल भारद्वाजच्या मुलाचा कुत्ते प्रदर्शित झाला आणि त्यानं प्रेक्षकांना बोलण्याची आयतीच संधी दिली आहे.
Kuttey Review
Kuttey Review esakal
Updated on

Kuttey Review Aasmaan Bhardwaj director : बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाच्या शैलीमुळे प्रसिद्ध झालेल्या विशाल भारद्वाजच्या मुलाचा कुत्ते प्रदर्शित झाला आणि त्यानं प्रेक्षकांना बोलण्याची आयतीच संधी दिली आहे. मोठ्या अपेक्षा घेऊन प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गेले खरे मात्र त्यांना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि कुत्तेचं तिकिट काढलं असं होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आसमान भारद्वाजचा पहिलाच प्रयत्न कौतूकास्पद आहे. मात्र त्याला ज्या माध्यमातून त्याची गोष्ट सांगायची आहे ती तितक्याच तीव्रतेनं तो पोहचवू शकला नाही. असे कुत्तेमधून दिसून येते. म्हणून तर एवढी मोठी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांना तब्बुखेरीज दुसरं कुणीही लक्षात राहत नाही. तिचा अभिनय कौतूकास्पद आहे. दुसरीकडे कथा, तिचे सादरीकरण याबाबत अंधार आहे.

बऱ्याचदा आपण कुणाचे कोण आहोत, त्यांचे काम काय, त्यांची कारकीर्द, त्यांचा भारतीय प्रेक्षकांवर असलेला प्रभाव या साऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या ठरतात. आसमानच्याबाबत तेच घडल्याचे दिसून आले आहे. त्याचे वडील विशाल भारद्वाज मोठं नाव. त्यांच्या अपेक्षांना खरं उतरावं म्हणून आसमान केलेला प्रयत्न दखलपात्र आहे. पण प्रेक्षक विशाल भारव्दाजच्या मुलानं काय बनवलं आहे, हा विचार करुन जेव्हा जातात तेव्हा त्यांची निराशा होते.

स्टोरी काय आहे...

कुत्ते सुरु झाल्यापासून तो आपल्याला त्याचा अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न करु लागतो. जंगलात वाघ, बकरी आणि कुत्रा हे मिळून राहतात. आपल्या पद्धतीनं राहण्याचा प्रयत्नही करतात. हे तिघेही अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याचे प्रत्येकवेळी तीन वाटे करतात. बकरी जेव्हा तिच्या पद्धतीनं तीन हिस्से करते तेव्हा ते काही वाघाला आवडत नाही. तो बकरीला खाऊन टाकतो. कुत्र्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा तो आपली सगळी शिकार वाघासमोर देतो आणि बकरीची हाडं चघळू लागतो.

Kuttey Review
Pathaan Viral Video : 'झुमे जो पठाण' वर आंटी सुसाट सुटली! रस्त्यावरच नाचायला लागली

लोकशाहीमध्ये देखील थोड्याफार फरकानं या गोष्टी होत राहतात. त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण मुळ तत्वात काही फरक नाही. या कथेमध्ये देखील एक भ्रष्ट महिला पोलीस अधिकारी, तिची माणसं, अंमली पदार्थाची ने आण करणारे गुन्हेगार आणि एटीएममध्ये पैसा नेणारी व्हॅन, त्यात असणारी करोडो रुपये, त्यावर असणारी पोलिसांची नजर....पण शेवटी या सगळ्याचे होते काय हे सगळं कुत्तेतून आपल्याला पाहायला मिळतं.

Kuttey Review
Cirkus Review: रणवीरच्या नाठाळ 'माकडउड्या', सर्कशीचा 'खेळखंडोबा'!

सध्या बॉक्स ऑफिसवर कुत्ते ही फिल्म आघाडीवर आहे. आणि पुढचा आठवडा देखील ती राहिल. याचे कारण त्याच्या जोडीला आणखी कोणता चित्रपट नाही. दुसरीकडे शेवटच्या आठवड्यात किंग खान शाहरुखचा पठाण प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे त्याच्याशी टक्कर घेण्यास बॉलीवूडचा एकही चित्रपट सध्या नाही. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात कुत्तेला चांगली कमाई करण्याची संधी आहे.

Kuttey Review
Taaza Khabar Twitter Review : चाहत्यांना 'वसंत गावडे' आवडला, भुवन बाम भाव खावून गेला!

कुत्तेच्या जोडीला लकडबग्गा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र तो डब्बा मुव्ही निघाल्याचे दिसून आले आहे. त्याला मिळालेले रिव्ह्यु फारसे चांगले नाहीत. प्रसिद्ध कवी अहमद फैज फैज यांच्या कुत्ते या रचनेचा शोध आसमाननं त्याच्या चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना तो फारसा पडेल असे वाटत नाही. मात्र त्यात प्रसिद्ध गीतकार गुलजार यांची गीते आणि विशाल भारद्वाज यांचे संगीत लक्षवेधी आहे.

Kuttey Review
Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

दोन तासांपेक्षा कुत्तेचा रनिंग टाईम आहे. मात्र तेवढ्या वेळ बसणे देखील आपल्याला असह्य होऊन जाते. याचे कारण पडद्यावर काय सुरु आहे हेच कळत नाही. सगळा गोंधळ आहे. शिव्यांचा भडिमार आहे. डायलॉगची सरबत्ती आहे. कोण कुणाचे कोण..याचाच शोध घेण्यात डोके दुखू लागते. त्यात पात्रांच्या नावांची यादी मोठी असून ती लक्षात ठेवून त्यांचा एकमेकांशी संबंध लावण्यात गोंधळ होत असल्याचे दिसून येते.

Kuttey Review
Avatar The Way Of Water Review: तिकीट कितीचे का असेना, 'अवतार' खूश करतोच! अविस्मरणीय अनुभव

विशाल भारद्वाजच्या कमिने मधील ते ढेन टेना...गाणं सारखं वाजत असतं. गाणं जुनचं पण त्याला नव्या पद्धतीनं सादर करण्यात आले आहे. बाकी लॉजिकच्या नावानं सगळा मामला गडबडलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपण काय पाहतो आहोत, काय चालले आहे याचा अर्थ लावता केव्हा थिएटरबाहेर पडतो ते कळत नाही. तेव्हा फक्त तोंडातून शिव्यांचा भडिमार सुरु होतो हे मात्र नक्की...

----------------------------------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - कुत्ते

कलाकार - तब्बु, अर्जुन कपूर, कुमूद मिश्रा, कोंकणा सेन शर्मा, राधिका मदान, नसिरुद्दीन शहा

दिग्दर्शक - आसमान विशाल भारद्वाज

रेटिंग - अडीच स्टार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.