सम्राट पृथ्वीराज: रिलीजच्या एक दिवस आधी आखाती देशांनी केलं बॅन? काय खटकलं?

अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' सिनेमा ट्रेलर रिलीजनंतर विविध कारणांनी वादात पडलेला दिसून आला आहे.
Kuwait, Oman ban ‘Samrat Prithviraj’ in run up to its release
Kuwait, Oman ban ‘Samrat Prithviraj’ in run up to its releaseGoogle
Updated on

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या(Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज'(Samrat Prithviraj) सिनेमाची जेव्हापासून घोषणा झाली तेव्हापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. मात्र ट्रेलर रिलीजनंतर विविध कारणांनी हा सिनेमा वादातही पडलेला दिसून आला. आता पुन्हा प्रदर्शनाआधी एक दिवस बातमी कानावर पडतेय की ओमान,कुवेत(Kuwait, Oman ban) मध्ये सिनेमावर बंदी आणली गेली आहे. सिनेमाशी संबंधित काही सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. अद्याप या ओमान,कुवेतमध्ये सिनेमावर बंदी का आणली याविषयी मात्र कोणतेही कारण समोर आलेले नाही.(Kuwait, Oman ban ‘Samrat Prithviraj’ in run up to its release)

Kuwait, Oman ban ‘Samrat Prithviraj’ in run up to its release
KK ची मुलं काय करतात? गायकासारखंच संगीत क्षेत्राशी आहे का कनेक्शन?

मी़डियाला मिळालेल्या माहिती नुसार सिनेमाला ओमान,कुवेतमध्ये बॅन केलं गेल्याची बातमी आहे. पण अद्याप याविषयी अधिकृतपणे काही सांगण्यात आलेलं नाही. सिनेमाच्या टीमनं देखील याविषयीच्या बातम्यांना दुजोरा दिलेला नाही. भारताचा शेवटचा हिंदू सम्राट म्हणून ओळखले जाणारे पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत हा ऐतिहासिक सिनेमा ३ जून,२०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Kuwait, Oman ban ‘Samrat Prithviraj’ in run up to its release
KK ची तब्येत बिघडण्यास सभागृहातील गर्दी,फोम स्प्रे कारणीभूत? मोठा खुलासा

काही दिवसांपूर्वी हा सिनेमा एका वेगळ्याच कारणानं वादात पडला होता. राजपूत करणी सेनेनं या सिनेमाचं टायटल बदलण्याची मागणी केली होती. करणी सेनेनं धमकी दिली होती की जर सिनेमाचं नाव बदललं नाही तर तो राजस्थान मध्ये प्रदर्शित करु दिला जाणार नाही. त्यानंतर २७ मे ला सिनेमाच्या टीमनं 'पृथ्वीराज' नाव बदलून या सिनेमाचं नाव 'सम्राट पृथ्वीराज' केल्याचं जाहिर केलं.

Kuwait, Oman ban ‘Samrat Prithviraj’ in run up to its release
'राजकीय खेळी सामान्य माणसाला विवस्त्र करते','रानबाजार'चे नवीन भाग येतायत...

या सिनेमात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत म्हणजे 'सम्राट पृथ्वीराज' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तर मानुषी छिल्लर पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. संजय दत्त,सोनू सूद,आशुतोष राणा आणि मानव विज हे कलाकार देखील सिनेमातील इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.