Prakash Jha On Aamir: 'स्टोरीच नाही तर कशाला बनवतो चित्रपट'? बंद कर हे...

सोशल मीडियावर आमिरच्या लाल सिंग चढ्ढावरील रोष अजुनही कायम आहे. त्यात बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांनी आमिरवर टीका टिप्पणी केली आहे.
Prakash Jha On Aamir
Prakash Jha On Aamiresakal
Updated on

Laal Singh Chaddha movie news: सोशल मीडियावर आमिरच्या लाल सिंग चढ्ढावरील रोष अजुनही कायम आहे. त्यात बॉलीवूडमधील दिग्गज दिग्दर्शकांनी आमिरवर टीका टिप्पणी केली आहे. द काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक (aamir khan news) अग्निहोत्री यांनी आमिरवर तोफ डागल्यानंतर आश्रम या लोकप्रिय (bollywood news) मालिकेचे दिग्दर्शक प्रकाश झा यांनी देखील आमिरला एक मोलाचा सल्ला दिला आहे. जो आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आमिरच्या लाल सिंग चढ्ढाला प्रेक्षकांकडून बहिष्कृत करण्यात आले होते. सोशल मीडियावर आमिरच्या विरोधात असलेला राग यावेळी दिसून आला होता. त्याचा परिणाम आमिरच्या चित्रपटावर झाला होता.

बॉयकॉट बॉलीवूडमध्ये केवळ आमिरचा लाल सिंग चढ्ढाच नाहीतर अक्षय कुमारचा रक्षाबंधनही होता. त्यालाही मोठा झटका बसला होता. आता आमिरचा कटपुतली नावाचा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला असून त्याला मात्र प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याच दिसून आले आहे. रक्षाबंधनची भरपाई त्यानं या चित्रपटाच्या निमित्तानं भरुन निघाली आहे. यासगळ्यात प्रकाश झा यांनी आमिरला दिलेला सल्ला चर्चेत आला आहे. प्रकाश हे सध्या त्यांच्या मट्टो की सायकल नावाच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्यांना आमिरच्या लाल सिंग चढ्ढावरुन प्रश्न विचारण्यात आला होता.

प्रकाश झा यांनी आमिरच्या त्या प्रोजेक्टविषयी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, तुमच्याकडे जर चांगली स्टोरी असेल तर लोकं त्याचे कौतूक करतातच. आता चांगली स्टोरी नाही आणि तुम्ही त्यावर बिग बजेट चित्रपटाची घोषणा करुन त्याची निर्मिती करता. हे सगळं प्रेक्षकांना कसे आवडेल, याचा विचार एक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आपल्याला करावा लागेल. आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा सगळ्यांसाठी वेक अप कॉल आहे. त्यातून आपण सर्वांनी काही गोष्टी शिकण्याची गरज असल्याचे झा यांनी म्हटले आहे.

Prakash Jha On Aamir
ग्लोबल बाप्पा : न्यूयॉर्क ते दुबई; गौरी पूजनाचे मुहूर्त

आमिरच्या लाल सिंग चढ्ढाकडून मोठ्या अपेक्षा प्रेक्षकांना होत्या. मात्र त्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. अनेकांनी सोशल मीडियावरील सुरु असलेल्या ट्रेंडचा मोठा फटका आमिरला बसल्याचे म्हटले आहे. यासगळ्यात काही दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना दोष न देता आपण जेव्हा एखादी फिल्म बनवतो तेव्हा त्याच्या कथेबाबत गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आश्रमचे दिग्दर्शक यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली आहे.

Prakash Jha On Aamir
स्मार्टफोनमुळे डोळ्यांची जळजळ? गणपतीला वाहिलेल्या या पत्रीचा रस देईल आराम

चित्रपट चांगले असतील तर ते चालतीलच. त्यातील कथा प्रेक्षकांच्या हदयाचा ठाव घेणार असेल तर ते लोकांना अपील होते. आमिरच्या बाबत जे झाले ते सगळ्यांसमोर आहे. तेव्हा आता वेळ अशी आहे की, आपण सर्वांनी त्यातून धडा घ्यायला हवा. जर तुमच्याकडे चांगली कथा नाही तर तुम्ही त्यावर चित्रपट बनवण्याचा आग्रह धरु नये. असेही झा यांनी यावेळी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.