Laal Singh Chaddha Movie News: आमिर खानचा लाल सिंग चढ्ढा गेल्या दोन आठवड्यांपासून सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. सध्या सोशल मीडियावर एकच विषय आहे तो म्हणजे आमिर खान आणि त्याचा लाल सिंग चढ्ढा. येत्या (Social media viral news) अकरा ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये करिना कपूर खान, नागा चैतन्य यांच्या भूमिका आहेत. हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटावर आधारित हिंदी रिमेक असणाऱ्या लाल सिंग चढ्ढाचे (Forest Gump hindi remake) दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आमिरला या चित्रपटामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वादाचा सामना करावा लागत आहे. करण जोहरच्या कार्यक्रमामध्ये त्यानं त्यावर सविस्तर उत्तरेही दिली आहे. यासगळ्यात प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळेनं आमिरला विचारलेल्या प्रश्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
नागराज हा त्याच्या हटक्या कलाकृतीमुळे ओळखला जाणारा सेलिब्रेटी दिग्दर्शक (Director Nagraj Manjule) आहे. त्याच्या फँड्री, सैराट आणि काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झुंडला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बिग बी अमिताभ बच्चन यांना घेऊन नागराजनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. झुंड हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. बॉक्स ऑफिसवर त्याला फारसं यश मिळालं नसलं तरी नागराजच्या चाहत्यांकडून, समीक्षक, अभ्यासक यांच्याकडून झुंडच्या वाट्याला अमाप कौतूक आलं. यासगळ्यात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिरसाठी झुंडचं खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं.
आमिरनं जेव्हा झुंड पाहिला तेव्हा कमालीचा भावूक झाला होता. आता नागराजनं आमिरला त्याच्या लाल सिंग चढ्ढावरुन एक प्रश्न विचारला आहे. आमिरनंही त्याला सविस्तर उत्तर दिलं आहे. नागराज म्हणतो, तुम्ही लाल सिंग चढ्ढामझ्ये साकारलेली व्यक्तिरेखा पंजाबीच का आहे, आणि ती व्यक्तिरेखा कशी सुचली असा प्रश्न नागराजनं केला. त्यानं आमिर खानची मुलाखत घेतली. त्यावेळी त्याला हा प्रश्न केला. आमिरनं नागराजला दिलेल्या उत्तरात असं म्हटलं आहे की, प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी या लाल सिंग चढ्ढाची स्क्रिप्ट लिहिली. ती लिहित असताना त्यांच्यासमोर पंजाबी व्यक्तिरेखाच होती. ज्यावेळी त्यांनी आम्हाला ही पटकथा वाचून दाखवली तेव्हा आम्हाला ती आवडली. आणि पुढे त्यावर चित्रपट करण्याचे ठरले.
आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा आता प्रदर्शनासाठी तयार आहे. मात्र त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे वाद होत असल्याचे दिसून आले आहे. हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंप या चित्रपटाचा हिंदी रिमेक लाल सिंग चढ्ढा आहे. त्याचे दिग्दर्शन अव्दैत चंदन यांनी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून आमिर हा त्याच्या या फिल्मवर काम करत असल्याचे दिसुन आले आहे. त्यानं प्रेक्षकांना वादात पडण्यापेक्षा हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.