Laal Singh Chaddha Review: निव्वळ 'डब्बा'! IMDB कडून 10 पैकी फक्त 4 रेटिंग

ज्यांनी हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट फॉरेस्ट गंप पाहिला असेल त्यांना आमिरचा लाल सिंग चढ्ढा फारसा विशेष वाटणार नाही.
Laal Singh Chaddha Review
Laal Singh Chaddha Reviewesakal
Updated on

Laal Singh Chaddha: ज्यांनी हॉलीवूडचा प्रसिद्ध चित्रपट फॉरेस्ट गंप पाहिला असेल त्यांना आमिरचा लाल सिंग चढ्ढा फारसा विशेष वाटणार नाही. आपल्याकडे (Boycott Laal Singh Chadda) हॉलीवूडच्या चित्रपटांचे आकर्षण असणाऱ्या मंडळींची संख्या मोठी आहे. अशावेळी फॉरेस्ट गंप त्यांनी पाहिला नसेल अशी अपेक्षा ठेवणं हे जरा चुकीचचं ठरेल. गेल्या काही दिवसांपासून आमिरच्या लाल (Hollywood Movie Forest Gump) सिंग चढ्ढावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद सुरु झाले आहे. काही झालं तरी हा चित्रपट आम्ही पाहणार नाही अशी रोखठोक भूमिका प्रेक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आले आहे. कित्येक नेटकऱ्यांनी बॉयकॉट लाल सिंग चढ्ढा असा ट्रेंड सुरु करण्यात आला असून तो बऱ्याच दिवसांपासून ट्रेंडिंग आहे.

आज आमिरचा लाल सिंग चढ्ढा आणि अक्षयचा रक्षाबंधन हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आहे. अनेकांनी त्याचं तोंडभरून कौतूक केलं असलं तरी बहुतांशी जणांनी आमिरच्या या चित्रपटाला नावं ठेवण्यात धन्यता मानली आहे. आयएमडीबी सारख्या वेबसाईटनं लाल सिंग चढ्ढाला दहा पैकी केवळ चारच गुण दिले आहेत. त्यावरुन हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायला जायचा की नाही याविषयी शंका आहे. कित्येक प्रेक्षकांचे असे म्हणणे आहे की, फॉरेस्ट गंप सारख्या चित्रपटाची फ्रेम बाय फ्रेम कॉपी करण्यापेक्षा आणखी वेगळी कलाकृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला असता तर ते पाहायला जास्त आवडले असते. दुसऱ्या एकानं निव्वळ डब्बा मुव्ही असून तो पाहणे शक्यतो टाळा असे म्हटले आहे.

विदेशी चित्रपट समीक्षकांकडून आमिरच्या धाडसाचे कौतूक होत आहे. त्यानं फॉरेस्ट गंपचे जे शिवधनुष्य पेललं आहे ते खरचं ग्रेट आहे. त्याचा लाल सिंग चढ्ढा हा एक स्वतंत्र कलाकृतीचा विषय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. द गार्डियन सारख्या दैनिकानं देखील आमिरच्या लाल सिंग चढ्ढाची दखल घेतली असून त्याच्याप्रती कौतूकाचे शब्द लिहिले आहे. आमिरची कलाकृती वेगळा आनंद देणारी आहे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आपल्याकडे आमिरच्या वाट्याला टीका आली आहे. त्यांनी लाल सिंग चढ्ढाला कॉपी आणि पेस्ट मुव्ही प्रकारात टाकले आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबत नागा चैतन्य, करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Laal Singh Chaddha Review
Laal Singh Chaddha Review

यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आमिरचा लाल सिंग पाहण्यास गर्दी केल्याचे दिसून आले. या चित्रपटाच्या प्रिमिअरला अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते त्यांनी आमिरवर कौतूकाचा वर्षाव केला आहे. यासगळ्यात प्रेक्षकांकडून मात्र आमिरला मोठी अपेक्षा आहे. 180 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या लाल सिंग चढ्डा बॉक्स ऑफिवर हिट होईल असे भारतीय सिनेमा परिक्षकांचे म्हणणे आहे. यासगळ्यात सोशल मीडियावरुन आमिरच्या विरोधात होणारा प्रचार हा त्याच्या चित्रपटासाठी साधक ठरणार की बाधक हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Laal Singh Chaddha Review
Laal Singh Chaddha Review

लाल सिंग चढ्ढामधील गाणी, त्यातील संवाद, छायाचित्रण याचे कौतूक होतंय. मात्र अनेकांच्या लेखी या चित्रपटाच्या कथेचे मुळ हे भारतीय नसल्यानं त्याचे अॅडपटेशन करताना काही उणीवा जाणवतात. ज्यांनी टॉम हँक्सचा फॉरेस्ट गंप पाहिला नसेल त्यांना आमिरची ही कलाकृती नक्की भारावून टाकेल यात शंका नाही. मात्र ज्यांनी तो पाहिला असेल त्यांना आमिरचे काम निराश करेल अशीही भीती आहे. सध्या आयएमडीबीवर लाल सिंग चढ्ढाला जे रेटिंग दिलं गेलं आहे त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे.

Laal Singh Chaddha Review
Darling Review: 'दैवं देतं कर्म नेतं' सांगणारा 'डार्लिंग', आलियाची कमाल!

आयएमडीबीच्या साईटवर जे रिव्ह्यु आहेत त्यातील अनेकांनी लाल सिंग चढ्ढावर टीका केली आहे. त्यांनी त्याला खूप दुषणं देखील दिले आहेत. मोठ्या कालावधीनंतर आमिर हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे अशावेळी त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तो त्यावर खरा उतरला नसल्याचे त्या प्रेक्षकांचे म्हणणे असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे सलग सुट्टया आणि आमिरचा लाल सिंग चढ्ढा यामुळे प्रेक्षकांना फारसा चॉईस म्हणजे अक्षयचा रक्षाबंधन आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता आहे.

Laal Singh Chaddha Review
Boycott Laal Singh Chaddha: 'तू ज्ञान नको पाजळू!' स्वराला नेटकऱ्यांनी झापलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.