दक्षिणेत अक्षयच्या पुढे निघून गेला आमिर; एक्सपर्टनी सांगितलं यामागचं कारण
Laal Singh Chaddha & Rakshabandhan: लाल सिंग चड्ढा आणि रक्षा बंधन हे दोन सिनेमे ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात रिलीज झाले. दोन्ही असे सिनेमे ज्यांच्याकडून प्रेक्षकांना आणि अर्थात बॉक्सऑफिसला देखील मोठी आशा होती. एका सिनेमाचा हिरो 'द परफेक्शनिस्ट' आमिर खान आणि दुसऱ्या सिनेमाचा 'खिलाडी' अक्षय कुमार. या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली असली तरी दोघांकडूनही या वर्षातील बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होणाऱ्या मोठ्या कमाईची आशा आहे. पण शुक्रवारी १२ ऑगस्ट रोजी जर दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे पाहिले तर ते निराशा करणारेच आहेत. जिथे आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी १२ करोडची कमाई केली,तिथे रक्षाबंधनने ९ करोडच्या आसपास गल्ला जमवला.(Laal Singh Chaddha Opening box office collection double than raksha bandhan in south)
पण बॉक्सऑफिसवर असं चित्र जरी दिसत असलं तरी लाल सिंग चड्ढानं दक्षिणेत रक्षाबंधनपेक्षा दमदार सुरुवात केल्याचं दिसून आलं. फिल्म बिझनेस एक्सपर्ट रमेश बालाने सांगितले आहे की रक्षाबंधनने दक्षिणेत फक्त १ करोडचा बिझनेस केला आहे तर लाल सिंग चड्ढाने त्याच्या जवळपास तिप्पट कमाई केली आहे. लाल सिंग चड्ढाच्या कमाईचा आकडा २.५ ते ३ करोड इतका समोर आला आहे.
अपेक्षेपेक्षा दोन्ही सिनेमांची कमाई कमी झाल्याविषयी रमेश बाला म्हणाले आहेत की,''दक्षिणेत असे सिनेमे हिट होतात जे ऑलरेडी नॉर्थ मध्ये चांगले चाललेले आहेत. हे दोन्ही सिनेमे उत्तर भारतातही स्ट्रगलच करत आहेत त्यामुळे दक्षिणेतही हे मोठी कमाई करणं कठीण दिसतंय''.
त्यांनी सांगितले की, ''जर ३ इडियट्स,पीके आणि वॉर सारखे सिनेमे नॉर्थ मध्ये चांगला बिझनेस करतात तर ते दक्षिणेतही चालतात. अशा सिनेमांचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. हिंदी सिनेमांचा प्रेक्षक वर्ग हा कॉस्मोपॉलिटन असतो. दोन्ही सिनेमांची कमाई कमी होण्यामागे हेच कारण आहे. त्यातच सूर्याचा भाऊ कार्थीचा विरुमन देखील रिलीज झाला आहे,त्याची कमाई देखील बॉक्सऑफिसवर चांगली सुरु आहे. तरीही अक्षयच्या सिनेमाच्या तुलनेत आमिरच्या सिनेमाची कमाई चांगलं होण्यामागे एक कारण आहे''.
बाला पुढे म्हणाले,''दक्षिणेचं मार्केट पाहिलं तर हिंदी सिनेमे जास्तकरुन शहरात रिलीज केले जातात. त्यांना खुप मोठं ओपनिंग मिळत नाही. पण आमिरच्या सिनेमाला दक्षिणेत मिळालं कारण हा सिनेमा तामिळ आणि तेलुगुत रिलीज केला गेला आहे''.
आमिर आणि अक्षय दोघांच्या सिनेमांची घोडदौड धीम्या गतीन बॉक्सऑफिसवर सुरू आहे. आता लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे की हे सिनेमे अजून किती दिवस तग धरुन राहतायत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.