Laal Singh Chaddha: यूपी मध्ये घराघरात जाऊन आमिरच्या विरोधात प्रचार,नवा वाद

उत्तर प्रदेशातील काही हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली असून,बंदीच्या मागणीनं जोर धरला आहे.
Aamir Khan's Laal SIngh Chaddha Controversy
Aamir Khan's Laal SIngh Chaddha ControversyGoogle
Updated on

Laal Singh Chaddha Controversy: आमिर खानचा लाल सिंग चड्ढा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. सिनेमा रिलीज आधीपासूनच वादात पडला होता. सोशल मीडियावर सिनेमाला बॉयकॉट करण्याची मागणी केली गेली होती. सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आणि समिक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया यावर पहायला मिळत आहेत. पण आता नव्यानं काही हिंदू संघटनांनी सिनेमाला विरोध करायला सुरुवात केली आहे. सिनेमावर बंदीची मागणी यामुळे पुन्हा जोर धरु लागली आहे.(Laal singh Chaddha- Sanatan Rakshak sena demands ban on aamir's laal singh chaddha movie)

Aamir Khan's Laal SIngh Chaddha Controversy
Anjali Arora MMS वर आझमा फलाहचा खळबळजनक दावा; म्हणाली,'हे तिच्याच...'

सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज झाल्यानंतर काही संघटनांनी सिनेमाला विरोध दर्शविला. बातमीनुसार,वाराणसीच्या आईपी विजया मॉलच्या बाहेर सनातन रक्षक सेनाने आमिर खान आणि त्याच्या लाल सिंग चड्ढा सिनेमाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेने उत्तर प्रदेशात सिनेमावर बंदीची मागणी केली आहे. आणि आमिर खानवर हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे.

Aamir Khan's Laal SIngh Chaddha Controversy
Laal Singh Chaddha मध्ये दिसणार भारतातील तब्बल 11 ऐतिहासिक घटना, जाणून घ्या

सनातन रक्षक सेनाच्या यूथ विभागाचे अध्यक्ष चंद्र प्रकाश सिंग आणि उपाध्यक्ष अरुण पांडेने आरोप केला आहे की आमिर खानने ना केवळ हिंदू देवतांचा अपमान केला आहे तर त्यानं सनातन धर्माचा देखील विरोध केला आहे. ते म्हणाले, ''आम्ही घराघरात जाऊन अपील करु की आमिर खानच्या सिनेमाला बॉयकॉट करा. त्यासोबतच,आम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडेही सिनेमावर बंदी आणण्याची मागणी करणार आहोत''.

Aamir Khan's Laal SIngh Chaddha Controversy
Har Har Shambhu Controversy: युट्युबने हटवलं गाणं,पकडली फरमानी नाझची चोरी!

लाल सिंग चड्ढाला होणाऱ्या वाढत्या विरोधानंतर आमिर खानने माफी मागत लोकांना सिनेमा पहायचं आवाहन केलं होतं. तो म्हणाला होता,''जर मी कोणाचं मन दुःखावलं असेल कुठल्याही कारणानं तर मला त्याचा खेद आहे, कोणाचेही मन दुखवायचा माझा हेतू केव्हाच नव्हता''.

Aamir Khan's Laal SIngh Chaddha Controversy
Laal Singh Chaddha चे नाव का जोडले जातेय पाकिस्तानशी? समोर आली मोठी माहिती

लाल सिंग चड्ढा हा सिनेमा हॉलीवूडचा गाजलेला सिनेमा 'फॉरेस्ट गम्प'चा ऑफिशिअल रीमेक आहे. ज्यामध्ये टॉम हॅंक्स मुख्य भूमिकेत होता. तर लाल सिंग चड्ढा मध्ये आमिर खानसोबत करिना कपूर,मोना सिंग आणि नागा चैतन्य देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.