Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhan: 'आमीर - अक्षय' दोघंही गोत्यात!

बॉलीवूडचे दोन दिग्गज अभिनेते आमिर खान आणि अक्षय कुमार यांना नेटकऱ्यांच्या टीकेचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे.
Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhan
Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhanesakal
Updated on

Boycott Bollywood Movies Forever: बॉलीवूडचे दोन दिग्गज अभिनेते आमिर खान आणि अक्षय कुमार यांना नेटकऱ्यांच्या टीकेचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. आमिरच्या लाल सिंग चढ्ढावर तर अक्षयच्या रक्षाबंधन या (Bollywood Actor Aamir Khan) चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरुन करण्यात येत आहे. यासगळ्यात अभिनेत्यांनी प्रेक्षकांची, चाहत्यांची (Bollywood Actor Akshay Kumar) सातत्यानं माफी मागून त्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले होते. मात्र त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे. आमिर आणि अक्षयला त्यांच्या आतापर्यतच्या करिअरमध्ये एवढा वाईट प्रतिसाद कधी मिळाला नव्हता. जेवढा तो आता प्रेक्षकांकडून मिळत आहे. ते दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले असून दोन्ही सेलिब्रेटी हे चांगलेच वैतागले आहेत.

प्रेक्षकांशी पंगा घेणं, त्यांना उद्देशुन काही बोलणं आणि त्यांना गृहित धरणं हे किती महागात पडू शकतं याचा प्रत्यय अक्षय आणि आमिर दोघंही घेत आहेत. गेल्या आठवडाभरापासून हे सेलिब्रेटी चर्चेत आले आहेत. त्यांच्या चित्रपटांना फारच कमी प्रतिसाद मिळाला आहे. आमिरचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा लाल सिंग चढ्ढा बॉक्स ऑफिसवर पडताना दिसतोय. दीडशे कोटींहून अधिक बजेट असणाऱ्या या चित्रपटानं आतापर्यत केवळ 9 कोटींची कमाई केली आहे. फिल्म मार्केट अॅनलिस्ट तरण आदर्शनं याबाबत म्हटलं आहे की, लाल सिंग चढ्ढा फार तर तीस कोटींपर्यत मजल मारु शकते. अशीच गत ही अक्षयच्या रक्षाबंधन बाबत आहे. या चित्रपटानं देखील चाहत्यांची निराशा केली आहे.

अक्षय कुमारच्या रक्षाबंधननं तिसऱ्या दिवशी 6.51 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या काळात हे चित्रपट आणखी किती चालणार, त्याला प्रेक्षकवर्ग मिळणार का असा सवाल यावेळी चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. दिग्दर्शक अद्नैत चंदन यांनी लाल सिंग चढ्ढाचे दिग्दर्शन केले आहे. लाल सिंग चढ्ढा हा 1994 मध्ये आलेल्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. हॉलीवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेता टॉम हँक्सनं प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती.

Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhan
Raksha Bandhan movie: 'सावळा रंग कमी पैसे, गोरा रंग जास्त पैसे...'

फॉरेस्ट गंपवर ऑस्करचा वर्षाव झाला होता. आमिरनं हा चित्रपट केल्यानंतर त्याच्यावर टीका सुरु झाली आहे. त्यानं काही वर्षांपूर्वी देश सोडून जाण्यापूर्वी एक विधान केले होते. या चित्रपटाच्या निमित्तानं ते पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे. त्यामुळे आमिर खानवर प्रचंड टीका होताना दिसत आहे. लाल सिंग चढ्ढामध्ये आमिर सोबतच करिना कपूर आणि नागा चैतन्य यांच्याही भूमिका आहेत.

Laal Singh Chaddha Vs Raksha Bandhan
Boycott Laal Singh Chaddha: ट्रोलर्सवर करिना भडकली, 'ही अशी लोकं जी...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.