Laal Singh Chaddha Boycott: 'जे वाटतं ते मी पोस्ट करणार!' बेबोची प्रतिक्रिया

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा सध्या वादात सापडला आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढावरुन सोशल मीडियावर मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे.
Laal Singh Chaddha Boycott news
Laal Singh Chaddha Boycott news esakal
Updated on

Bollywood Laal Singh Chaddha Movie: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा सध्या वादात सापडला आहे. त्याच्या लाल सिंग चढ्ढावरुन सोशल मीडियावर मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. लाल सिंग चढ्ढा बॉयकॉट असा (Bollywood Actor) ट्रेंड सुरु झाला आहे. त्यावर आमीरनं आपली बाजुही मांडली आहे. लोकांना चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले आहे. यासगळ्यावर आता करिनानं परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर जोरदापणे लाल सिंग चढ्ढाचे प्रमोशन सुरु झाले आहे.

आमीरच्या लाल सिंग चढ्ढाला बॉयकॉट करा असा ट्रेंड सुरु झाला असताना (Aamir Khan) त्यावर करिना कपूर खाननं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, आज प्रत्येकाला बोलण्याचा (Bollywood Actress Kareena Kapoor) अधिकार आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर प्रत्येकजण त्याचे म्हणणे मांडू शकतो. मात्र यासगळ्यात एवढे पर्याय तुमच्याकडे असताना काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला आपण शिकलं पाहिजे. त्यामुळे मी अशा गोष्टींचे काही टेन्शन घेत नाही. त्याला गांभीर्यानं घेण्यापेक्षा त्या टाळणे अधिक महत्वाचे आहे. मला जी पोस्ट करायची आहे ते मी करणार असं करिनानं म्हटलं आहे.

करिना कपूर म्हणते, ही एक फिल्म आहे. आणि आता ती रिलिज होणार आहे. त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येकाची वेगळी धारणा आहे. त्याच्याबाबत मतमतांतरे देखील असतील. जर हा चित्रपट लोकांना आवडला तर तो पाहण्यासाठी आणखी लोकं जातील. त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. मला वाटतं चांगले चित्रपट हे नेहमीच सगळ्या कक्षा ओलांडून पलीकडे जातात. त्याला कुठल्याही प्रकारचे बंधन उरत नाही. सध्या सोशल मीडियावर लाल सिंग चढ्ढावर वेगवेगळ्या प्रकारे टीका होत आहे. नेटकऱ्यांनी त्यावरुन आमीरला ट्रोल कऱण्यास सुरुवात केली आहे.

करिनापूर्वी आमीर खाननं देखील बॉयकॉट लाल सिंग चढ्ढावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, जेव्हा माझ्या चित्रपटांवर बॉयकॉट असा शिक्का मारला जातो तेव्हा मात्र मला खूप वाईट वाटते. माझ्या काही वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला आहे. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार त्यावेळी मात्र वेगळ्या पद्धतीनं त्याला सोशल मीडियातू समोर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मला असे वाटते की, लोकांनी मला चुकीच्या चष्म्यातून पाहिले नाही. भारताविषयी केलेलं ते वक्तव्य त्यावरुन मी अनेकदा माझी बाजुही मांडली आहे.

Laal Singh Chaddha Boycott news
Video: या कलाकारांनी घेतला पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार

लाल सिंग चढ्ढा हा हॉलीवूडच्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. फॉरेस्ट गंपमध्ये टॉम हँक्सनं प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदीमध्ये तिच भूमिका आमीर खान साकारतो आहे. याशिवाय लाल सिंग चढ्ढामध्ये करिना कपूर, मोना सिंग, नागा चैतन्य सारखे कलाकार दिसणार आहेत. असं म्हटलं जातं की, लाल सिंग चढ्ढा हा देशातील वेगवेगळ्या शंभर ठिकाणी शुट करण्यात आला आहे. आमिरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मी या चित्रपटासाठी बारा वर्षे दिली आहेत. अद्वैत चंदन यांनी लाल सिंग चढ्ढाचे दिग्दर्शन केले आहे. 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Laal Singh Chaddha Boycott news
'जो स्त्रीचा अपमान करेल...'; संजय राऊतांवरील कंगनाचं वक्तव्य Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()