Laapataa Ladies Official Trailer : लग्न करुन घरी परतत होता, वाटेत बायकोच हरवली! लापता लेडीजचा भन्नाट ट्रेलर!

'लापता लेडीज' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं पुन्हा एकदा आपली ठळक ओळख निर्माण केली आहे.
Laapataa Ladies Official Trailer
Laapataa Ladies Official Trailer esakal
Updated on

Laapataa Ladies Official Trailer Kiran Rao Director : 'लापता लेडीज' नावाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं पुन्हा एकदा आपली ठळक ओळख निर्माण केली आहे. किरण रावचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.त्याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे. तब्बल १४ वर्षानंतर किरण राव कमबॅक करताना दिसणार आहे.

धोबी घाट नंतर किरण राव यांची वेगळी कलाकृती आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. लापता लेडीजचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होताना दिसत आहे. त्याला यापूर्वी वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवांमधून गौरविण्यात आले आहे.

ट्रेलरमध्ये दिसून येते की, एका युवकाचे नुकतेच लग्न झाले आहे. तो त्याच्या पत्नीसहित घरी येतो. त्यावेळी घरातील महिला नववधूला ओवाळण्यासाठी पुढे येतात तेव्हा त्या युवकाला कळते की, ही आपली पत्नी नाहीच. तो तिला पाहून चक्रावूनच जातो. त्यानंतर जे घडते त्याची कथा लापता लेडीजमध्ये मांडण्यात आली आहे. काही तासांपूर्वी व्हायरल झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अर्थात टीफमध्ये किरण रावच्या लापता लेडीजला वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यावेळी त्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर हा चर्चेत आला आहे. त्यावर आलेल्या कमेंटस् देखील भन्नाट आहेत. एकीकडे हृतिकचा फायटर चर्चेत असताना अशावेळी किरण रावचा लापता लेडीज हा नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

टीफमध्ये जेव्हा किरण रावच्या लापता लेडीजचे कौतुक झाले होते तेव्हा तिनं प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, हा चित्रपट आमच्यासाठी खूपच महत्वाचा होता. एका वेगळ्या विषयाची मांडणी या निमित्तानं आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. तो प्रेक्षकांना आवडेल अशी आम्हाला आशा आहे. असे देखील किरण राव यांनी म्हटले होते. आमिरनं देखील किरण रावचे कौतुक केले होते.

जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांची निर्मिती असलेल्या तसेच आमिर खान आणि काईंडलिंग प्रॉडक्शनच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाची पटकथा बिप्लाब गोस्वामी यांनी लिहिली आहे. तर स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन स्नेहा देसाई यांनी केले आहे. अतिरिक्त संवादलेखन दिव्यानिधी शर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.