Lalit Modi Affair : सुष्मिता सेननंतर 'या' मॉडेलच्या प्रेमात ललित मोदी? हरिश साळवेंच्या पार्टीत चमकले!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनबरोबर नाव जोडल्या गेलेल्या मोदी यांच्या आणि सुष्मिताच्या डेटिंगची चर्चा रंगली होती.
Lalit Modi ujjwala raut photo going viral on
Lalit Modi ujjwala raut photo going viral onesakal
Updated on

Lalit Modi ujjwala raut photo going viral on : आयपीएलचे सर्वेसर्वा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललित मोदींची गोष्टच वेगळी आहे. मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर ते भारतातून दुसऱ्या देशात पळून गेले. त्यानंतर भारतातील तपास यंत्रणा त्यांच्या शोधात असल्याचे दिसून आले आहे.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनबरोबर नाव जोडल्या गेलेल्या मोदी यांच्या आणि सुष्मिताच्या डेटिंगची चर्चा रंगली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत होती. त्यावर नेटकऱ्यांनी सुष्मिताला ट्रोल केले होते. जो व्यक्ती भारतात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करुन गेला आहे त्याच्या सोबत मैत्री सुष्मिता कशी काय करु शकते, असा प्रश्न तिला नेटकऱ्यांकडून विचारला जात होता.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आता पुन्हा एकदा मोदी चर्चेत आले आहे. त्याला कारणही तसेच आहे. भारताचे माजी जनरल सॉलिसिटर हरीश साळवे यांच्या लग्नाच्या पार्टीमध्ये ललित मोदी हे दिसून आले होते. त्यावेळी ते एका महिलेसोबत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना सुरुवातही झाली आहे. आता अशी बातमी समोर आली आहे की, मोदी हे सुपरमॉडेलच्या प्रेमात पडले आहे.

गेल्या वर्षी ललित मोदी आणि सुष्मिता सेनचे सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली होती. त्यानंतर सुष्मिताला त्यावरुन खुलासाही करावा लागला होता. आपला आणि ललित मोदी यांचा कोणताही संबंध नाही असे तिनं सांगितले होते. डीएनएनच्या एका बातमीनुसार मोदी हे पुन्हा प्रेमात पडल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे.

Lalit Modi ujjwala raut photo going viral on
Harish Salve Marriage : सलमानला 'हिट अँड रन' केसमध्ये वाचवणारे वकील लग्नबंधनात; ६८व्या वर्षी केलं तिसरं लग्न!

नुकतेच भारताचे पूर्व सॉलिसीटर जनरल हरीश साळवे आणि ट्रीना यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. त्या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर आले असून त्यावर नेटकऱ्यांनी त्या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.

ललित मोदी यांनी एक फॉर्मल आऊटफिट परिधान केले असून उज्जवलानं पर्पल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.