Lalit Prabhakar - Prajakta Mali: 'जुळून येती रेशीमगाठी'चा दुसरा भाग येणार? ललितच्या 'त्या' पोस्टने चर्चांना उधाण

ललित प्रभाकर - प्राजक्ता माळीच्या जुळून येती रेशीमगाठी मालिकेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत
lalit prabhakar prajakta mali meet for 10 years of julun yeti reshimgathi
lalit prabhakar prajakta mali meet for 10 years of julun yeti reshimgathiEsakal
Updated on

Lalit Prabhakar - Prajakta Mali News:

ललित प्रभाकर - प्राजक्ता माळीची जुळून येती रेशीमगाठी मालिका सर्वांना आजही आठवत असेल. ललित - प्राजक्ताच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली.

अशातच जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा दुसरा भाग येणार? अशी चर्चा सुरु झालीय. कारणही तसंच खास आहे.

lalit prabhakar prajakta mali meet for 10 years of julun yeti reshimgathi
Naal 2 Review: उसवलेल्या नात्यांची वीण घट्ट करणारा 'नाळ भाग 2', वाचा कसा आहे सिनेमा

जुळून येती रेशीमगाठी 2 येणार?

झालं असं की, ललित प्रभाकरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने जुळून येती रेशीमगाठी मालिकेची टीम एकत्र आली होती. यानिमित्ताने प्राजक्ता - ललितने खास फोटोशूट केलंय.

हे फोटोशूट करुन ललितने कॅप्शनमध्ये सांगितलंय की, "काढायचा का दुसरा भाग? जुळून येती रेशीमगाठी.. नाम तो सुना होगा."

जुळून येती रेशीमगाठी मालिकेची १० वर्ष

झी मराठीवर २०१३ साली जुळून येती रेशीमगाठी ही मालिका सुरु झाली. ललित प्रभाकर - प्राजक्ता माळी या दोघांचीही ही पहिली मालिका होती. दोघांनी आदित्य - मेघना अशा भूमिका साकारल्या. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

या मालिकेत सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, डॉ. गिरीश ओक अशा कलाकारांनी भुमिका साकारल्या. या मालिकेला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. जुळून येती रेशीमगाठी मालिकेचा दुसरा भाग जर आलाच तर नक्कीच प्रेक्षकांना तो बघायला आवडेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.