अखेरच्या शोमध्ये KK ने गायली होती १८ गाणी, playlist झाली व्हायरल

केकेच्या निधनानंतर त्याने अखेरच्या शोमध्ये गायलेल्या गाण्याची प्लेलिस्ट व्हायरल होत आहे.
अखेरच्या शोमध्ये KK ने गायली होती १८ गाणी, playlist झाली व्हायरल
esakal
Updated on

लोकप्रिय गायक केके आता या जगात नाहीत. मंगळवारी कोलकाता येथील महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांची प्राणजोत मालवली. त्याच्या निधनानंतर त्याने या अखेरच्या शोमध्ये गायलेल्या गाण्याची प्लेलिस्ट व्हायरल होत आहे.

अखेरच्या शोमध्ये KK ने गायली होती १८ गाणी, playlist झाली व्हायरल
KK ची मुलं काय करतात? गायकासारखंच संगीत क्षेत्राशी आहे का कनेक्शन?

व्हायरल झालेली प्लेलिस्ट १८ गाण्यांची होती. केकेने ही गाणी स्वतः लिहीली होता. केकेने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत २०० पेक्षा अधिक गाणी गायली होती.

केके ने हिंदी सह तमिळ, तेलुगु, कन्नड आणि बंगाली यांसारख्या भाषेत गाणी गायली आहेत. तुम मिले, बचना ऐ हसीनो, ओम शांति ओम, जन्नत, वो लम्हें, गुंडे, भूल भुलैया, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांमधील गाण्यांना त्याने आवाज दिला आहे.

1999 मध्ये त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' हे गाणे गायले होते. ज्याला पहिल्यांदाच देशभरात मान्यता मिळाली. त्याच वर्षी त्यांचा एक अल्बमही रिलीज झाला. या अल्बममधील 'याद आएगा वो पल' हे गाणे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय झाले. आजही शाळा-महाविद्यालयांच्या निरोप समारंभात गायले जाणारे हे लोकप्रिय गाणे आहे.

अखेरच्या शोमध्ये KK ने गायली होती १८ गाणी, playlist झाली व्हायरल
KK च्या 'तडप तडप' गाण्याला ऐकून काय म्हणालेला सलमान? संगीतकारही घाबरलेला...

वयाने ५३ व्या वर्षी जगाला अलविदा केलं. मंगळवारी ३१ मे रोजी,एका लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान केके ला हृद्यविकाराचा झटका आला. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार लाइव्ह कॉन्सर्टमध्ये अटॅक आल्यानंतर केकेला थेट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं. पण तिथे पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.