लता मंगेशकरांची तब्येत स्थिर; अफवांवर ठेऊ नका विश्वास

Lata Mangeshkar
Lata Mangeshkar
Updated on

मुंबई: दैवी आवाज अशा शब्दांत ज्यांच्या गायकीचं वर्णन अनेकांनी केलंय त्या ज्येष्ठ सिने गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली आहे. त्यामुळे त्यांची तब्येत अस्थिर असून त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु आहेत.

Lata Mangeshkar
अत्यंत दिलासादायक! मुंबईची रुग्णसंख्या आठ हजारांच्याही खाली

त्यांच्या तब्येतीसंदर्भात आता माहिती कळवण्यात आली आहे. लता मंगेशकर यांच्या पीआर टीमकडून असं कळवण्यात आलंय की, लता मंगेशकर यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, त्यांच्यासंदर्भात खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत हे पाहून त्रास होतो आहे. लता दीदींची प्रकृती स्थिर आहे. सक्षम डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरु असून त्या आयसीयूमध्ये आहे. कृपया त्या लवकर सुखरुप घरी परतण्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती त्यांच्या पीआर टीममधील अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.