lata mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत दुनियेतलं असं नाव जे कायम अजरामर राहणार आहे. त्यांची गाणी, त्यांची साधना, त्यांचा प्रवास हा प्रत्येकासाठीच प्रेरणादायी होता.
आज लता दिदी आपल्यात नाही. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचा अजरामर स्वर मात्र त्यांनी अनंत काळासाठी मागे ठेवला.
ज्या आवाजानं केवळ भारतालाच नाही तर साऱ्या जगातील संगीतप्रेमींना आपल्या सुरावटींनी वेड लावलं त्या दिदींविषयी प्रत्येकाच्याच मनात आदराचे स्थान आहे. पण एक काळ असा होता की लता मंगेशकर यांच्यावर अनेक आरोप केले गेले.
लता दिदी यांच्या बदनामीचा प्रयत्न झाला. त्याची प्रचंड चर्चाही झाली. पण त्यांच्या अनमोल स्वरापुढे या सगळ्या चर्चा फिक्या ठरल्या आणि लता दिदी हे नाव गाजतच राहिलं..
असं म्हणतात की लता दिदी जेव्हा बॉलीवुडमध्ये आल्या तेव्हा प्रत्येक संगीतकाराला असं वाटत होतं की लता दिदींनी आपल्यासाठी गावं. प्रत्येक चित्रपटात त्यांची गाणी असावी असा अट्टहास असायचा. त्यामुळे कित्येक दशकं त्यांच्या गाण्याने सजली गेली.
पण जेव्हा माणूस प्रगती करतो तेव्हा त्याचे शत्रूही निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्या या प्रगतीला चर्चेचे गालबोट लागले. एक काळ असा आला की बॉलीवूडमध्ये लता दिदींची बदनामी करण्याचा प्रकार झाला.
लता दिदी यांना समकालीन आणि नंतरच्या पिढीतले आलेले बरेच गायक प्रतिस्पर्धी होते. पण लता दिदींचा आवाज इतका मधुर आणि लोकप्रिय ठरला की त्यापुढे इतरांचा फारसा निभाव लागला नाही. त्यामुळे लता मंगेशकर यांनी अनेक गायकांचा करियर संपवलं असा आरोप केला गेला. यावर बॉलीवुडमध्ये बरीच चर्चा झाली. पण लता दिदींनी मात्र यावर सडेतोड उत्तर दिले होते. त्याचाच एक जूना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
यामध्ये दिदी म्हणतात, ''मी कोण आहे, मी काय आहे हे मला माहीत आहे. मी किती चांगली आहे आणि किती वाईट हेही मला माहीत आहे. मी कुणाचं वाईट केलं, कुणाचं चांगलं केलं हेही मला माहीत आहे. मग मी त्यावर का उत्तर देऊ, मी का त्या आरोपांचं उत्तर देऊ. त्यापेक्षा मी पूजा करण्यात माझा वेळ सार्थकी लावेल. मी अशा गोष्टींना महत्व देत नाही.''
त्यावर मुलाखतकार म्हणतात, पण ही बदनामी करणारी माणसं नक्की कोण आहेत? त्यावर लता दिदी म्हणतात, '' ''हे आपल्याच क्षेत्रातील लोक आहेत. कुणी आपले आहेत, कुणी बाहेरचे.. मला माहीत नाही. कदाचित ते मित्र म्हणून माझ्या घरीही येत असतील.मला कुणाचं नाव माहीत नाही. त्यामुळे मी अशा चर्चांवर विश्वास ठेवत नाही.'' ही मुलाखत सध्या बरीच व्हायरल होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.