आज लता मंगेशकर यांची जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊ एक खास किस्सा. ही गोष्ट आहे १९७३-७४ ची. जेव्हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत क्षेत्रातील मंगेशकर घराणं रायगड किल्ला पाहण्यासाठी गेले होते. त्यांना रायगड किल्ल्याची माहिती देण्याची जबाबदारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर होती.
कुटूंबातील सर्व सदस्य रायगड भ्रमंती करत रायगडाच्या त्या ठिकाणावर पोहोचले. जिथून खाली पहायला अनेक लोकांचा थरकाप होतो. ते म्हणजे टकमक टोक.
रायगडवरील एक भितीदायक असे ठिकाण. जिथे मृत्युला देखील थरकाप वाटतो असा तो बेलाग टकमक टोक. गुन्हेगारांना टकमकीची शिक्षा सुनावत असे, शिक्षा ऐकुणच गुन्हेगारांचे अर्धमरण व्हायचे.
त्या टोकावरून समोरील पर्वतरांगेचा फोटो काढत होत्या. सुरांची महाराणी असलेल्या लता दिदींना जणू ते समोरील निसर्गच कॅमेऱ्यात कैद करून घ्यायचा होता. पण, काहीच कळायच्या आधी लता दीदींच्या हातून तो कॅमेरा निसटला. आणि टकमट टोकावरून थेट खोल दरीत कोसळला.
१९७५ च्या काळात कॅमेरा असणं हि मोठी बाब होती. त्यामूळे लता दिदींना कॅमेरा हवा तर होता. पण, तो आणण्यासाठी जिवाची बाजी लावणार कोण, यामूळे तो विषय लताजींनी सोडून दिला. त्या मुंबईला परतल्या.
दोनच दिवसात ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. गाणसम्राज्ञी लतादीदींचा कॅमेरा टकमक टोकावरून पडल्याची बातमी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावात पोहोचली. मोरू काटकर नावाच्या व्यक्तीलाही ती बातमी समजली.
मोरू काटकर यांनी दोन दिवसांनी टकमक टोकावर चढून कॅमेरा शोधायचे ठरवले. आणि त्यांनी टकमक टोकांच्या खालच्या बाजून वर चढण्यास सुरूवात केली. थोडावेळ चढल्यावर एका झाडाच्या फांदीवर अडकलेला कॅमेरा त्यांना दिसला. त्या काळात कॅमेरा शोधला म्हणून लोकांनी त्यांच्याकडे तो कॅमेरा विकत मागितला. त्याकाळात कॅमेरा असणे ही अतिश्रीमंत असल्यासारखे होते. त्यामूळे तो कॅमेरा सगळेच लोक मागत होते.
पण तो कॅमेरा लता मंगेशकर यांनाच परत करायचा असा ठरवून तो व्यक्ती रायगडवरून महाडला आणि तिथून मुंबईला पायी चालत गेला. लतादीदींच्या घरासमोर तो पोहोचला. पण, वॉचमनने त्याला आत सोडले नाही. त्याने लतादीदींचा कॅमेरा दाखवला तेव्हा लतादीदीनीं त्यांना आत बोलावले. त्यांचा पाहुणचार केला. त्यांना बक्षीस म्हणून साडेतीन हजार रूपये दिले.
कॅमेरा सापडला आणि तो दिला हे नाते केवळ एवढ्यावरच राहिले नाही. तर, आता-आता पर्यंत दर दिवाळीला मोरू काटकर यांच्या घरी मिठाईचे बॉक्स, फराळ येत होता.
(सदर माहिती, गडप्रेमी व्लॉगर स्वप्नील यांच्या व्हिडीओतून घेतलेली आहे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.