Lata Mangeshkar: भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Lata Mangeshkar passed away) सकाळी आठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यानं भारतीय संगीत विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून लता दीदी या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होत होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर लता दीदींची झुंज अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. लता दीदींच्या जाण्याचे वृत्त कळताच बॉलीवू़डमधील अनेक सेलिब्रेटींनी (Bollywood celebrity) आदरांजली वाहिली आहे. 8 जानेवारीला लता दीदींना कोरोनाची लागण झाली होती.
बॉलीवू़डची क्वीन कंगना रनौतनं (kangana ranuat) लता दीदींच्या प्रती आदरांजली वाहिली आहे. तिनं इंस्टावर पोस्ट शेयर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिनं म्हटलं आहे की, भारतानं आपला सुंदर आवाज गमावला आहे. त्यांच्या जाण्यानं मला खूप वेदना झाल्या आहेत. लता दीदींसारखी अन्य कुणी होणार नाही. मला जेव्हा त्या गेल्याचं कळलं तेव्हा माझे अश्रु थांबेना, मला अजूनही रडू येतंय. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं देखील लता दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, मेरी आवाजही मेरी पहचान है, असं सांगणाऱ्या लता दीदींचा आवाज हा जगभरात लोकप्रिय होता. त्यांच्या जाण्यानं आपल्या संगीत विश्वाची मोठी हानी झाली. त्यांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून येणारी नाही.
अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी देखील व्टिट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला अतिशय वेदना झाल्या आहेत. संगीतातील प्राण म्हणून लता दीदींची ओळख होती. लताजी यांची आपल्या आय़ुष्यात एक वेगळे स्थान होते. त्यांनी गायलेली गाणी आजही चाहत्यांच्या मनात आहे. त्यांची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. त्यांना मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. बोनी कपूर यांनी लता दीदींच्या जाण्यावर अतीव दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या गाण्यांनी एक आगळावेगळा वारसा मागे सोडला आहे.
अजय देवगणनं (Ajay Devgn) लिहिलं आहे की, मी नेहमीच लता मंगेशकर यांना माझं आयडॉल मानलं आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला आहे. मी नेहमीच त्यांची गाणी ऐकत आलो आहे. आम्ही खरचं किती भाग्यवान आहोत की, आम्ही त्यांची गाणी ऐकत मोठे झालो. त्यांच्या कुटूंबियाप्रती मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यावेळी प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी देखील लता दीदींना आदरांजली वाहिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.