लता मंगेशकर त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं की पुन्हा ऐकायच्या नाहीत...का?

वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅंडी इस्पितळात गानसम्राज्ञीनं अखेरचा श्वास घेतला.
Memories of Lata Mangeshkar
Memories of Lata MangeshkarGoogle
Updated on

लता मंगेशकर(Lata Mangeshkar) म्हणजे भारताला मिळालेली एक दैवी देणगी. सुरांचा हा एक अध्याय आज संपला खरा पण आयुष्यभरासाठी एक मौलिक देणगी प्रत्येकाला देवून गेलाय हे नक्की. भारतरत्न लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीचकॅंडी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या महिन्याभरापासून कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली अनेक दिवस तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या दरम्यान त्यांची तब्येत वर-खाली होत होती पण त्यानंतर मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून आली होती. काहीच दिवसांपूर्वी त्यांचे व्हेंटिलेटरही काढण्यात आले होते. आज (६ फेब्रुवारी) रोजी सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Memories of Lata Mangeshkar)

Memories of Lata Mangeshkar
अमिताभ बच्चन यांचा नातू अनं शाहरुखच्या लेकीचं अखेर ठरलं?

लता दिदींच्या अशा खुप आठवणी मनात आहेत ज्या त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं ऐकण्याचा योग आला होता. एकदा त्या म्हणाल्या होत्या,''मी माझं गाणं रेकॉर्डिंग नंतर कधीच ऐकलं नाही आजतागायत. मला ते ऐकायला कायम भीती वाटत आली आहे. मला नेहमी वाटत आलंय माझं काहीतरी चुकलं असेल,काहीतरी राहून गेलं असेल तर. किंबहुना नंतर कधीतरी रीलीज झाल्यावर ऐकायचे तेव्हा मीच माझ्या गाण्यातील कितीतरी चुका काढायचे. मग उगाचच काहीतरी राहून गेल्याचं शल्य मनाला सतवायचं. म्हणून माझं गाणं मी रेकॉर्ड झाल्यावर पुन्हा ऐकायचं बंद केलं नंतर-नंतर.

पण मला वाटतं इतर गायक आवडीनं त्यांची गाणी रेकॉर्ड झाली की ऐकतात. त्यांच्या मनात कदाचित गाण्याला घेऊन भीती नसेलही किंवा असेलही. पण ऐकत असतील तर चांगलंच आहे, मला वाटतं ते ऐकायला हवं. मी मात्र ठरवून ते कधीच ऐकलं नाही. किंवा प्रयत्न करूनही तसं करू शकले नाही. आता त्याचं कारण म्हणजे भीतीच. ती आजही इतक्या वर्षांनतर गाणं गायल्यानंतर वाटतच आहे''. आज दिदींच्या जाण्यानंतर त्यांच्या आठवणींचा झरा डोळ्यासमोरून वाहू लागला अन् ही आठवण इथं सांगावीशी वाटली. लता मंगेशकर यांना ईसकाळ परिवारातर्फे श्रद्धांजली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.