Lavaste At Cannes : 'लावारिस' मृतदेहांचा सांभाळ करणाऱ्या सत्यांशचा 'लावास्ते'! कान्समध्ये प्रीमियर

जगप्रसिद्ध अशा कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता एका भारतीय चित्रपटाची चर्चा आहे. त्याचे नाव लावास्ते.
Lavaste At Cannes
Lavaste At Cannesesakal
Updated on

Lavaste movie trailer out movie is based on lawaaris deathbodies : आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी माणसाची धडपड सुरु आहे. तो सातत्यानं पळतो आहे. त्याच्या जीवाला जराही स्वस्थता नाही. आराम नाही. त्यामुळेच की काय कुटूंबाला काय हवं काय नको ते पाहण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. आयुष्य संपतं आणि उरतो तो मानवी देह ज्याला दिला मुखाग्नी, मात्र काहींच्या वाट्याला ते देखील येत नाही. लावास्ते नावाचा चित्रपट यासारख्या विषयावर भाष्य करताना दिसतो.

जगप्रसिद्ध अशा कान्स चित्रपट महोत्सवामध्ये आता एका भारतीय चित्रपटाची चर्चा आहे. त्याचे नाव लावास्ते. या चित्रपटाचा प्रीमिअर कान्समध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतामध्ये १३ मे रोजी लावास्तेचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्याला नेटकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या संकल्पनेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

लावास्तेचा प्रीमिअर कान्समध्ये होणार असल्याचे कळताच सिनेप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे. त्यात अभिनेता ओमकार कपूर, मनोज जोशी, कुरुश डेबू आणि गुलशन पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भारतामध्ये हा चित्रपट २६ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती मेकर्सच्यावतीनं देण्यात आली आहे. आगळ्या वेगळ्या विषयाची मांडणी करणारा लावस्ते काय आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Lavaste At Cannes
The Kerala Story पाहून अदा शर्माचा पती बनलेल्या इशराकचा राग करायचे लोक.. पण आता म्हणू लागले देवमाणूस,असं काय बदललं?

बी टेक झालेल्या सत्यांशची ही गोष्ट आहे. तो ज्या मृतदेहांचा स्विकार त्यांच्या घरच्यांनी केलेला नाही त्या मृतदेहांना सांभाळण्याची जबाबदारी घेतो. असं जगावेगळं काम करणाऱ्या सत्यांशची ही गोष्ट भलतीच भयानक आणि विचार करायला लावणारी आहे.

चित्रपटामध्ये असे दाखवण्यात आले आहे की, आपल्याला कुणी सांभाळणारं असूनही काही लोकं त्या व्यक्तींना सांभाळण्यास नकार देतात. आई वडिलांना सोडून देणं, नातेवाईकांशी नाते तोडणं यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींवर हा चित्रपट भाष्य करतो.

Lavaste At Cannes
Cannes 2023: आजवर या बोल्ड बॉलिवूड अभिनेत्रींनी गाजवलाय कान्सचा रेड कार्पेट

लावास्तेचे दिग्दर्शन सुदीश कनौजिया यांनी केलं असून निर्मिती आदित्य वर्मा आणि रोहनदीप सिंह यांनी केली आहे. आतापर्यत वेगवेगळ्या मुलाखतींतून दिग्दर्शकानं या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()