लॉरेन्स बिश्नोई टोळीने प्रसिद्धीसाठी दिली सलमानला धमकी; महाकाळचा खुलासा

Lawrence Bishnoi gang threatens Salman for publicity
Lawrence Bishnoi gang threatens Salman for publicityLawrence Bishnoi gang threatens Salman for publicity
Updated on

मुंबई : काही दिवसांपूर्वी सलमान खानला मिळालेल्या धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे. बुधवारी संपूर्ण टीम दिल्लीत पोहोचली. लॉरेन्स बिश्नोई टोळीची अनेक तास चौकशी सुरू होती. सलमान खानला (Salman Khan) धमकावण्यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या टोळीने सलमान खानला प्रसिद्धीसाठी (publicity) धमकावले (threat) होते, अशी माहिती सौरव महाकाळने चौकशीदरम्यान दिली. पोलिसांनी पत्र देणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवली आहे. (Lawrence Bishnoi gang threatens Salman for publicity)

बिष्णोईचा सहकारी असलेल्या विक्रम ब्रारच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आली होती. ब्रार सध्या कॅनडात आहेत. त्याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. सलमान खानला धमकी देण्यासाठी तिघेजण मुंबईत आल्याचे वृत्त आहे. तेथे त्यांची सौरव महाकाळ यांच्याशी भेट झाली. मुंबई क्राइम ब्रँचने महाकाळची सुमारे सहा तास चौकशी केली. या टोळीने सलमान खानला (Salman Khan) प्रसिद्धीसाठी धमकावले होते, अशी माहिती महाकाळने चौकशीदरम्यान दिली.

Lawrence Bishnoi gang threatens Salman for publicity
सुरजेवालांची जीभ घसरली; म्हणाले, सीता मातेचे जसे चीरहरण झाले...

सलमान खानला धमकी देण्यामागे विक्रम ब्रारचा हात आहे. ब्रार हा राजस्थानमधील हनुमानगड येथील रहिवासी आहे. सध्या तो देशाबाहेर आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी सलमान खानचीही मुंबई क्राइम ब्रँचने चौकशी केली होती. ब्रारला ओळखत नाही, असे सलमान म्हणाला होता. मी लॉरेन्स बिश्नोईला ओळखतो, तेही गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या केसमुळे. बाकीचे जितके ओळखतात तितकेच मी त्याला ओळखतो, असा सलमान खान म्हणाला होता.

धमकीनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ

‘सलमान खान लवकरच तुमची अवस्था सिद्धू मुसेवालासारखी होईल’ असे धमकीच्या पत्रात लिहिले होते. याप्रकरणी मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमानला धमकीचे (threat) पत्र मिळाल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत सातत्याने अपडेट्स येत आहेत. पोलिसही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहे.

Lawrence Bishnoi gang threatens Salman for publicity
मुलाचा मृतदेह देण्यासाठी मागितली लाच; आई-वडील मागताहेत भीक

पुण्यातून सौरव महाकाळला अटक

पंजाबी गायक व काँग्रेस नेता सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांची २९ मे रोजी मानसा जिल्ह्यात हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर आठ शार्पशूटर्सनी गोळीबार केला होता. या हत्याकांडात महाराष्ट्राचे कनेक्शन असल्याचे पुढे आले होते. पुण्यातील दोन गुंडांचा या हत्याकांडाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी सौरव महाकाळ याला अटक (arrested) केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.