Laxmikant Berde death anniversary : मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ गाजवणारा एक नट म्हणजे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे. मनोरंजन विश्वातल्या एका अढळताऱ्याने लवकर एक्झिट घेतली. पण त्यांच्या स्मृति आजही आपल्या मनात आहेत. आजही त्यांचे चित्रपट, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीतही आपले नाव कमावले. अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी हिंदी मध्ये आपला दबदबा निर्माण केला. त्यामुळे त्यांना मराठी हिंदी दोन्ही मनोरंजन विश्वातला अनुभव घेता आला. याच विषयी काही मिश्किल मुद्यांवर भाष्य करणारा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेते शेखर सुमन आणि लक्ष्या यांच्यामध्ये खुमासदार संवाद रंगलेला दिसतोय.
या मुलाखतीती शेखर सुमन म्हणतात, साधारण असं होतं कि जो नायक असतो, तो ज्या ज्या चित्रपटात काम करतो तो त्या त्या चित्रपटाच्या नायिकेच्या प्रेमात पडतो.. तसा अनुभव तुम्हाला आला आहे का? त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात, मराठी मनोरंजन विश्वात तरी असं होत नाही, त्यामुळे मला अनुभव नाही. ज्यावर सगळेच खूप हसतात.
पुढे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात , मराठीत असं होत नाही कारण मराठी मध्ये शारीरिक अकर्षाणाचे सिन नसतात, तिथे सगळं दुरूनच असतं. त्यावर शेखर सुमन म्हणतात, मग असं कधी होत नाही का की दिग्दर्शकाला सांगून की बाबा आमचे जरा जवळचे सिन शूट कर जेणेकरून नायिकेचे जवळ जाता येईल.. त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे अत्यंत खुमासदार उत्तर देतात. ते म्हणतात,'असं दिग्दर्शकाला विचारलं तर तो म्हणेल.. तुला जवळचे सिन द्यायला, मी काय मेलोय का.. ' आणि हे ऐकताच शेखर सुमन यांना हसू अनावर होतं .
पुढे शेखर सुमन म्हणतात, 'मग चित्रपटात काम करणाऱ्या नायिकेबाबत कधी आकर्षण वाटतं का? ' त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतात हो, आकर्षण निश्चितच वाटतं.. मग शेखर म्हणतात, मग आकर्षण होऊनही स्वतःवर संयम कसे ठेवता? त्यावर लक्ष्मीकांत म्हणतात, 'आपल्याला माहीत आहे ती गोष्ट मिळणार नाही तर मग कशाला त्याच्या मागे लागायचं..' ही भन्नाट मुलाखत सध्या भलतीच व्हायरल होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.