KAALI Controversy: 'काली मां 'Queer',दिग्दर्शिकेचं पुन्हा वादग्रस्त ट्वीट

दिग्दर्शिका लीना मणिमेकलई आपल्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरमुळे सध्या वादानं घेरलेली आहे.
Leena Manimekalai again made controversial tweet, said- my black mother is Queer
Leena Manimekalai again made controversial tweet, said- my black mother is QueerGoogle
Updated on

दिग्दर्शिका लीना मणिमेकलई (Leena Manimekalai) आपल्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरमुळे सध्या वादानं घेरलेली आहे. आता देखील सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्ट ट्वीट् विरोधात लोकांचा आक्रमक आवाज सुरुच आहे. तिच्याविरोधात अनेक राज्यात FIR देखील दाखल झाल्या आहेत. पण एवढं सगळं झाल्यानंतर,किंबहुना सुरु असताना पुन्हा लीना मणिमेकलईनं एक वादग्रस्ट ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये तिने हिंदू देवी काली मातेचं वर्णन करताना तिला 'Queer' म्हटलं आहे आणि तिची काली हिंदुत्वाला मोडीत काढते असं देकील आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.(Leena Manimekalai again made controversial tweet, said- my black mother is Queer)

आपल्या नवीन ट्वीट मध्ये लीना मणिमेकलईनं लिहिलं आहे,''माझी काली क्वीर(Queer) आहे, ती एक स्वतंत्र आत्मा आहे. ती पुरुषी नेतृत्वावर थुंकते. हिंदुत्वाला मोडीत काढते. भांडवलशाहीचा विनाश करते. ती आपल्या हजारो हातांनी प्रत्येकाला आपल्या मायेच्या सावलीत घेते''. लीनाच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरवरुन सगळा वाद सुरु झाला. त्या पोस्टरवर माता कालीच्या रुपात एक अभिनेत्री धुम्रपान करताना दिसत आहे. तिच्या हातात LBGTQ चे समर्थन करणारा झेंडा आहे. लीनाने आपल्या या ट्वीटमध्ये हिंदू देवी काली साठी Q म्हणजेच Queer चा उल्लेख केला आहे.

Leena Manimekalai again made controversial tweet, said- my black mother is Queer
KAALI Controversy:निर्माती लीना मणिमेकलई विरोधात दिल्ली,यूपीत तक्रार दाखल

Queer अशा लोकांना म्हणतात,जे लोक आपण पुरुष आहोत की स्त्री हे नक्की ठरवू शकत नाही. त्यांना त्यांच्या लिंगाविषयी मनात संभ्रम असतो. ते स्वतःला पुरुष,स्त्री,ट्रान्सजेंडर,लेस्बियन किंवा बायसेक्शुअल यापैकी काहीच मानत नाहीत. खरंतर LBGT मध्ये जे प्रकार आहेत,त्यांना Queer म्हटलं जाऊ शकतं. हे ते लोक आहेत ज्यांच्या मनात स्वतःच्या लिंगाविषयी,ओळखीविषयी संभ्रम आहे,कन्फ्युजन आहे.

Leena Manimekalai again made controversial tweet, said- my black mother is Queer
KAALI Controversy: कोण आहे लीना मणिमेकलई?तिला अटक करण्याची का होतेय मागणी?

काली पोस्टरवरनं रंगलेला वाद आता खूपच चिघळत चालला आहे. दिग्दर्शिका लीना विरोधात लुकआऊट सर्कुलर जारी केलं गेलं आहे. मध्यप्रदेश पोलिसांनी याला जारी केलं आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं होतं की,''कॅनडामध्ये राहणाऱ्या लीना च्या विरोधात लुकआऊट सर्कुलर जारी करण्याची मागणी आम्ही केंद्र सरकारकरडे करणार आहोत''. यानंतर या प्रकरणात केंद्र सरकारनं पावलं उचलत दिग्दर्शिकेच्या विरोधात लुकआऊट सर्कुलर जारी केलं आहे. याव्यतिरिक्त लीनाच्या विरोधात देशातील कितीतरी राज्यात,शहरांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Leena Manimekalai again made controversial tweet, said- my black mother is Queer
KAALI Controversy: लीनाचं नवं ट्वीट,शंकर-पार्वतीच्या फोटोवरनं रंगला नवा वाद

लीनाने २ जुलै रोजी ट्वीटरवर आपली डॉक्युमेंट्री 'काली' चे पोस्टर शेअर केले होते. यानंतर कॅनडाच्या आगा खान म्युझियम मध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या पोस्टरला दाखवलं गेलं होतं. याविरोधात कॅनडाच्या इंडियन हाय कमिशनद्वारा या पोस्टरवर आक्षेप घेतला गेला होता. त्यानंतर लीनानं आपल्या पोस्टला ब्लॉक केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.