KAALI Controversy: लीनाचं नवं ट्वीट,शंकर-पार्वतीच्या फोटोवरनं रंगला नवा वाद

'काली' सिनेमाच्या पोस्टरवर काली मातेच्या हातात सिगारेट दाखवून दिग्दर्शिका लीना मणिमेकलई वादात सापडली होती.
Leena Manimekalai New Tweet | Kaali Movie Poster Controversy
Leena Manimekalai New Tweet | Kaali Movie Poster ControversyGoogle
Updated on

'काली'(KAALI) पोस्टर वादावरनं गोंधळ उडालेला असताना दिग्दर्शिक लीना मणिमेकलईने (Leena Manimekalai)आता एक नवं ट्वीट केलं आहे. आणि यामुळे पुन्हा तिच्यावर टीका केली जात आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात शंकर-पार्वतीच्या वेशभूषेतले कलाकार धुम्रपान करताना दिसत आहेत.(KAALI Controversy:Leena Manimekalai New Tweet viral,new controversy)

फोटोवर ट्वीट करत तिनं लिहिलं आहे, 'कही और...' या तिच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी तिला पुन्हा टार्गेट करायला सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे,'ही फक्त चुकीच्या गोष्टी समाजात पसरवायचा प्रयत्न करते आहे'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'आपल्या धर्माचा अपमान करणं बंद कर'. लीना मणिमेकलईने केलेल्या ट्वीट केलेल्या फोटोवर राजकीय गटातूनही प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप नेता शहजाद पुनावालाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,'हे फक्त व्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली केलं जात नाहीय तर जाणूनबुजून समाजात तिढा निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे'.(Kaali Movie Poster Controversy)

हिंदूंना शिव्या देणा- धर्मनिरपेक्षता?

हिंदू श्रद्धेचा अपमा-उदारवाद?

शहजाद पूनावाला यांनी पुढे लिहिलं आहे की,'लीनाची हिम्मत वाढतेय कारण तिला माहित आहे की कॉंग्रेस,TMC(तृणमुल कॉंग्रेस) तिला पाठिंबा देतंय. आतापर्यंत तृणमुल कॉंग्रेसने महुआ मोइत्रावर कुठे काही कारवाई केली आहे'.नवीन वाद जो आता पुन्हा सुरु झाला आहे तो खरा तर लीनाच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरमुळे पहिल्यांदा पेटला. त्या पोस्टरवर काली मातेच्या रुपातील अभिनेत्री सिगारेट पिताना दिसत आहे. यावरनं सुरु झालेला वाद चिघळल्यानंतर ट्वीटरने निर्माता-दिग्दर्शक लीना मणिमेकलईच्या पोस्टला डिलीट केलं होतं.

Leena Manimekalai New Tweet | Kaali Movie Poster Controversy
रवी कपूर कसे बनले जितेंद्र? 'कपूर'आडनावाचा त्याग करण्यामागे मोठं कारण...

नवीन वाद जो आता पुन्हा सुरु झाला आहे तो खरा तर लीनाच्या 'काली' सिनेमाच्या पोस्टरमुळे पहिल्यांदा पेटला. त्या पोस्टरवर काली मातेच्या रुपातील अभिनेत्री सिगारेट पिताना दिसत आहे. यावरनं सुरु झालेला वाद चिघळल्यानंतर ट्वीटरने निर्माता-दिग्दर्शक लीना मणिमेकलईच्या पोस्टला डिलीट केलं होतं.

Leena Manimekalai New Tweet | Kaali Movie Poster Controversy
'हिला सिनेमात कोण सहन करणार',न्यासा देवगणवर ट्रोलर्सनी का साधला निशाणा?

'काली' सिनेमाच्या पोस्टरवरुन सुरु झालेल्या वादा दरम्यान लीना मणिमेकलईविरोधात काही राज्यात एफआयआर दाखल केली गेली आहे. दिल्ली,युपी,मुंबई मध्ये या सिनेमाच्या पोस्टरने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत 'काली' सिनेमाच्या निर्माती विरोधात एफआयआर दाखल केली गेली आहे.

Leena Manimekalai New Tweet | Kaali Movie Poster Controversy
'काली' पोस्टर वादात स्वरा भास्करची उडी,महुआ मोइत्रांचे समर्थन करत म्हणाली...

लीना मणिमेकलई मदुराई मधील सुदूर गावात महाराजापुरममध्ये राहणारी आहे. तिचे वडील हे शिक्षक होते. शेतकरी कुटुंबाशी तिचा जवळचा संबंध आहे. त्यांच्या गावाच्या परंपरेनुसार मुलींचे लग्न त्यांच्या मामासोबत केले जायचे. जेव्हा लीनाचे देखील लग्न तिच्या मामासोबत करायचे ठरले तेव्हा ती चेन्नईला पळून गेली. तिने तिथे इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले. आयटी सेक्टरमध्ये नोकरी देखील केली. पण तिथे मन रमंल नाही तेव्हा तिनं सिनेक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.