बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा(Akshay Kumar) 'राम सेतू'(Ram setu) प्रदर्शित होण्याआधीच वादात पडला आहे. हा सिनेमा लवकरच कायद्याच्या कचाट्यात सापडेल असं वातावरण सध्या निर्माण झालं आहे. बातमी आहे की रामसेतू सिनेमाचा अभिनेता अक्षय कुमारविरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी ही तक्रार करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यांचा दावा आहे की रामसेतू सिनेमात या राम सेतू मुद्द्याला खूप चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे अक्षय कुमार विरोधात आपण कोर्टात केस दाखल करणार आहोत असं स्वतः सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे.(Legal trouble for Akshay Kumar over 'Ram Setu'? Subramanian Swamy threatens to sue actor)
सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सुब्रमण्यम स्वामींचा दावा आहे की,अक्षयच्या राम सेतू सिनेमात काही घटना ,मुद्दे हे चुकीचे दाखवले गेले आहेत. मूळ घटनेसोबत,काही मुद्द्यांसोबत छेडछाड करुन विषयाला भरकटवले आहे. आपल्या ट्वीटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले आहे, ही केस माझ्यातर्फे वकील सत्या सभ्रवाल लढवणार आहेत. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडियावर त्यांच्या राम सेतू सिनेमात चुकीचे मुद्दे दाखवले गेल्यामुळे मोठं नुकसान झाल्याची केस दाखल करत आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी आणखी एक ट्वीट करत लिहिलं आहे-जर अक्षय कुमार एक परदेशी नागरिक आहे तर त्याला आपण अटक करण्याची मागणी नक्कीच करू शकतो. ज्या देशाचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे त्या देशाला आपण त्याला अटक करण्याची, त्याचं नागरिक्त्व रद्द करण्याची मागणी देखील करू शकतो.
माहितीसाठी इथं सांगतो की, एप्रिल महिन्यात राम सेतू सिनेमाचा पोस्टर व्हायरल झाला होता. अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्रामवर या सिनेमाचे पोस्टर शेअर केले होते. पोस्टरमध्ये अक्षय कुमारसोबत जॅकलिन आणि सत्यदेव दिसत होते. पोस्टर पाहिला तर कळेल की हे तिन्ही कलाकार एका ऐतिहासिक स्थळी आहेत. हे तिघेही एका गुहेत जाताना दिसत आहेत. त्या गुहेतील भिंतींवर खुप विचित्र पद्धतीचे निशाण देखील दिसत आहेत.
अक्षय कुमारचा राम सेतू सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे, सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे . काही दिवस आधीच मेकर्सनी सिनेमाची रिलीज डेट देखील ठरवलेली आहे. पण आता प्रदर्शना आधीच सिनेमा वादात पडल्याचं चित्र दिसत आहे. अक्षयचा रक्षाबंधन सिनेमा देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ११ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.