मुंबई - गानकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचा दोन दिवसांपूर्वी जन्मदिवस साधेपणानं साजरा कऱण्यात आला. त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचे अभिष्टचिंतन केले. दीदींनी त्यांचे आभार मानले आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभरात आपल्या आवाजानं रसिक श्रोत्यांचं प्रेम मिळवलेल्या दीदींवर यावेळी चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केल्याचे दिसुन आले आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देण्यात आला होता. यासगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Wishes Lata Mangeshkar) यांनी लताजींना जन्मदिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या होत्या. यासाठी त्यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावरुन शेयर केली होती. त्या पोस्टलाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. दीदींनी राज यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करुन त्यांचे आभार मानताना एक पोस्ट शेयर केली आहे.
राज यांनी आपल्या पोस्टमध्ये दीदींवर कौतूकाचा वर्षाव केला होता. त्यांनी लिहिलं होतं की, दीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीयांची स्वप्नं-आशाआकांक्षा यांचं प्रतीक आहे. त्यांच्या आवाजाला वय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे कोणतेही शिक्के नाहीत. दीदींचा आवाज हा एक निखळ सूर आहे, ज्याचा जन्म जरी वेदनेतून झाला असला तरी त्यात आत्मा आणि परमात्मा यांच्या अद्वैताचा साक्षात्कार आहे. दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या भारतीय गानकोकिळा लता दीदींना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, असं राज यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलं होतं.
'१९४२ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा अवघा भारत ब्रिटिशांना उद्देशून 'भारत छोडो'चा नारा देत होता, तेव्हा एका १३ वर्षीय मुलीनं भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुढची अनेक दशकं या जादुई आवाजानं कोट्यवधी भारतीयांच्या मनोजगतावर अधिराज्य केलं. त्या गायिकेचं नाव लता मंगेशकर! आपल्या सर्वांच्या लतादीदी. या शब्दांत राज यांनी आपल्या दीदींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या शुभेच्छांचा स्वीकार करुन दीदींनी देखील राज यांना प्रतिसाद दिला आहे. त्यांच्यासाठी लिहिलेल्या त्या खास पोस्टमध्ये दीदी म्हणतात, नमस्कार राज. आपण १९४२ चे सगळे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे केलेत आणि मी महाराष्ट्रीय आहे याचा मला अभिमान वाटला. मी काम करत राहिले आणि परमेश्वर आणि माई बाबांच्या आशिर्वादाने जे घडायचे होते ते सर्वांसमोर आहे. आपल्या शुभेच्छांबद्दल मनापासुन आभारी आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.