Kajol Devgan: "कमी शिकलेल्या राजकीय नेत्यांमुळं देशाची प्रगती मंदावली"; अभिनेत्री काजोलच्या विधानानं वादंग

आपल्या विधानावरुन वादंग माजल्यानंतर तीन यावरुन युटर्न घेतला आहे.
Kajol Devgan
Kajol Devgan
Updated on

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री काजोल हीनं एका कार्यक्रमात देशातील राजकारणावर केलेल्या विधानामुळं मोठं वादंग माजलं आहे. कमी शिकलेले लोक देश चालवत आहेत, अशा आशयाचं विधान तिनं केल्यानं मोठ्या ट्रोलिंगला तिला समोरं जावं लागलं आहे. वाद वाढत असल्याचं लक्षात येताच तिनं ट्विट करत आपल्या भूमिकेवरुन युटर्न घेतला. विशेष म्हणजे तिनं बोलताना कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही. (Less educated people run country Controversy over actress Kajol statement)

Kajol Devgan
Gautami Patil Ghungru: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमुळे गौतमीचा सिनेमा अडचणीत, घेतला हा मोठा निर्णय

काजोलनं आपल्याकडील राजकारण्यांचं कमी शिक्षण आणि त्यांच्या दूरदृष्टीवर सवाल उपस्थित केले होते. पण नंतर तीनं आपल्या या विधानावरुन युटर्न घेत. आपल्याला कोणत्या राजकीय नेत्याचा अपमान करायचा नव्हता. तसेच आपल्या देशात असे अनेक चांगले राजकीय नेते आहेत जे देशाला योग्य मार्गानं नेत आहेत, असं तीनं म्हटलं आहे.

काय म्हणाली होती काजोल?

एका वेबसाईटला मुलाखत देताना काजोलनं म्हटलं, "बदल, विशेषतः आपल्या भारतासारख्या देशात खूपच हळूवारपणे सुरु आहे. खूप हळू हळू बदल घडतोय. कारण आपण आपल्या परंपरा आणि विचार करण्याच्या प्रक्रियेत अडकून पडलो आहोत. याचं कारण शिक्षणातही आहे. आपल्याजवळ असे राजकीय नेते आहेत ज्यांना चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. यांपैकी अनेक नेत्यांजवळ तर दूरदृष्टीचं नाही, मला वाटतं ही दूरदृष्टी तुमच्यात शिक्षणामुळं येते. शिक्षणच तुम्हाला विविध परिप्रेक्षातून पाहण्याची संधी देते"

काय दिलं स्पष्टीकरण?

"मी केवळ शिक्षण आणि त्याच्या महत्वावर बोलत होते. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला अपमानित करणं आजिबात नव्हतं. आपल्याकडं काही जबरदस्त राजकीय नेते आहेत जे आपल्या देशाला योग्य मार्गानं नेत आहेत"

काजोल सध्या आपली वेबसीरिज 'द ट्रायल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अमेरिकन शो 'द गुड वाईफ'चं ही वेब सीरिज हिंदी अॅडेप्टेशन आहे. नुकतीच काजोलची लस्ट स्टोरीज ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.