मुंबई - निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर ने मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. बुधवारी असे सांगितले होते की, गुरुवारी प्रदर्शनाची तारीख प्रसिध्द होणार असल्याचे जाहिर करण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रख्यात कलाकार विजय देवरकोंडा याची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे. ज्यावेळी त्याचा टीझर प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याचे सेलिब्रेशन हा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय होता. त्याच्या पोस्टरला हार आणि दूधाने अभिषेक घालण्यात आला होता.
लायगर येत्या सप्टेंबरच्या ९ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्यावेळी ती पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा हा बॉलीवूडमध्ये इंट्री करणार आहे. विजयच्या बरोबर करण जोहरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, लायगर 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 5 भाषांमध्ये रिलिज होईल. हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांचा समावेश आहे.
विजय देवरकोंडानं या चित्रपटामध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. त्याचा हटके लूक सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. त्यासाठी त्यानं फार मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण थायलंडमध्ये झाली आहे. तिथं विजयनं मार्शल आर्टसचे ट्रेनिंग घेतले आहे. विजयशिवाय या चित्रपटामध्य़े राम्या कृष्णन, रॉनित रॉय, विष्णू रेड्डी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. य़ा चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे.
यापूर्वी लायगरचा फर्स्ट लुक समोर आला होता. करण जोहरनं तो सोशल मीडियावर शेयर केला होता. करणनं सांगितले होते की, त्यांची ही फिल्म भाषेची सर्व बंधनं तोडून टाकणार आहे. त्याचबरोबर एक नव्या दमाचा चित्रपटही यानिमित्तानं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांपासून करणवर दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव वाढतो आहे. त्यामुळे त्यानं त्यावर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.