मोठी बातमी : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीला अटक होण्याची शक्यता!

प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या अडचणीत वाढ होणार आहे.
Dancer Sapna Chaudhary
Dancer Sapna Chaudharyesakal
Updated on
Summary

प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या अडचणीत वाढ होणार आहे.

लखनौ : प्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) अडचणीत वाढ होणार आहे. कारण, तिच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. आज (बुधवार) यूपी पोलिसांचं (UP Police) पथक सपना चौधरीला अटक करण्यासाठी हरियाणाला (Haryana) रवाना झालंय.

लखनौच्या एसीजेएम कोर्टानं (ACJM Court) डान्सर सपना चौधरीवर डान्सचा कार्यक्रम रद्द केल्याबद्दल आणि तिकीटधारकांना पैसे परत न दिल्याबद्दल सोमवारी अटक वॉरंट जारी केलं. वास्तविक, सपना चौधरी सोमवारी सुनावणीसाठी हजर होणार होती. परंतु, सपना चौधरी न्यायालयात हजर राहिली नाही आणि तिच्या वतीनं कोणताही अर्ज करण्यात आला नाही. त्यावर कडक भूमिका घेत न्यायालयानं सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले.

Dancer Sapna Chaudhary
Ndtv Adani Deal : राजीनाम्याच्या वृत्तावर रवीश कुमारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मोदींनी मला...

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी पुढील सुनावणीची तारीख 30 सप्टेंबर निश्चित केलीय. नोव्हेंबर 2021 मध्ये देखील याच कोर्टानं तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं. त्यानंतर सपना चौधरी कोर्टात हजर झाली आणि तिला जामीन मिळाला. उपनिरीक्षक फिरोज खान यांनी 14 ऑक्टोबर 2018 रोजी शहरातील आशियाना पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता.

Dancer Sapna Chaudhary
नितीश कुमार बहुमत सिद्ध करण्याआधीच सभापती विजय सिन्हांचा राजीनामा

सूत्रांनुसार, सपना चौधरीनं 2018 मध्ये एका कार्यक्रमात परफॉर्म केलं नाही, ज्यासाठी तिला आयोजकांनी आगाऊ पैसे दिले होते. आयोजकांनी हे प्रकरण न्यायालयात खेचलं आणि आता नृत्यांगना सपना हिला लवकरच लखनौ येथील एसीजेएम न्यायालयात हजर केलं जाणार आहे. ही घटना 13 ऑक्टोबर 2018 रोजी घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.