Lust Stories 2 Review : एकट्यानचं पाहिलेला बरा, कुटूंबासमवेत चुकूनही पाहू नका...

लस्ट स्टोरीजकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षाही होत्या. मात्र यासगळ्यात यातील काही लघुपट वगळता बाकींच्यांनी निराशा केल्याचे दिसून येते.
Lust Stories 2 Review
Lust Stories 2 Review esakal
Updated on

Lust Stories 2 Review Neena Gupta To Kajol : ज्यांनी पहिला लस्ट स्टोरीज पाहिला असेल त्यांना आताच्या लस्ट स्टोरीजमधील लस्ट जरा जास्तच वाढल्याचे दिसून येईल. ओटीटीवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सेक्स एलिमेंट हा जास्तच वापरला जात आहे. लस्ट स्टोरीजचा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर त्याला मिळालेला चाहत्यांचा प्रतिसाद मोठा होता.

लस्ट स्टोरीजकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षाही होत्या. मात्र यासगळ्यात यातील काही लघुपट वगळता बाकींच्यांनी निराशा केल्याचे दिसून येते. स्त्री ही नेहमीच वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून टीकेची धनी राहिलेली दिसते. कुटूंब, मुलं, नोकरी, वैयक्तिक आयुष्य, यासगळ्यात तिची स्वप्नं काही केल्या पूर्ण होत नाही. ती पूर्ण झाली तरी कोणत्या ना कोणत्या भूमिकेत तिला वावरावे लागते. ती भूमिका गेल्या कित्येक काळापासून चालत आलेली आहे.

Also Read - Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

नव्या भूमिकेचे स्वागत करुन जुन्याला तिलांजली देणे हे नेहमीच धाडसाचे ठरते. अशावेळी ज्या कुणी वेगळी वाट धरण्याचा प्रयत्न केला त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यात महिलांचा वाटा सर्वाधिक आहे. लस्ट स्टोरिजमध्ये महिलांच्या त्या गोष्टीसाठी त्यांना किती वेगवेगळ्या प्रकारच्या मानापमानाला सामोरं जावं लागतं हे प्रभावी मांडण्यात आले आहे. अर्थात त्या बऱ्याचशा गोष्टी या सेक्सच्या माध्यमातून समोर येतात. अशावेळी अनेकांना त्यातून देण्यात आलेला मेसेज खटकल्यासारखा वाटण्याची शक्यता आहे.

Lust Stories 2 Review
Lust Stories 2 Review

लस्ट स्टोरीज वेग घेते ते कोंकणा सेननं दिग्दर्शित केलेल्या गोष्टीपासून. त्यात दोन महिलांची गोष्ट सांगण्यात आली आहे. त्यातील एक कॉर्पोरेट क्षेत्रातील आहे. आणि तिला मायग्रेनचा त्रास आहे. त्यानंतर जो त्यांचा प्रवास सुरु होतो तो कोंकणानं मोठ्या हिंमतीनं सादर केला आहे.

कामभावना आणि त्यानिमित्तानं येणाऱ्या अडचणी, संघर्ष त्यातून होणारी मानसिक घुसमट याचे प्रभावी चित्रण लस्ट स्टोरीजच्या निमित्तानं दिसून येते. त्यामुळे चार लघुपटांची ही मालिका पाहताना शक्यतो ती एकट्यानं पाहिल्यास उत्तम हे आवर्जून सांगावेसे वाटते.

त्या चारही गोष्टींच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. त्यात तिच्या लैंगिक आयुष्यावर, लैंगिक स्वातंत्र्यावर आणि त्यातून ती च्या स्वातंत्र्याविषयी भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. मात्र यासगळ्यात नीना गुप्ता यांची भूमिका रंगतदार झाली आहे.

बाकीच्या कलाकारांचा अभिनय ठीकठाक आहे. ज्यांनी पहिला लस्ट स्टोरीज पाहिला असेल त्यांना या चित्रपटामध्ये फारसे नाविन्य आढळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे फार अपेक्षा म्हणून पाहू नका.

चार लघुपटांमध्ये कोणताही समान धागा नाही. त्यांचा क्रमही वेगळाच आहे. त्यामुळे विषयांचे वैविध्य आणि नाविन्य म्हणून त्याकडे पाहावे लागते. एक लघुपट संपल्यानंतर ब्लॅक फ्रेम येते त्यानंतर पुन्हा दुसऱ्या लघुपटाला सुरुवात. मात्र यासगळ्याला जोडून ठेवणारी जी गोष्ट असते ती त्यात नाही. यामुळे आपण प्रत्येक नवीन गोष्ट, नवा आशय पाहत असल्याचे जाणवते. ते खूप काही बोल्ड आहे. असे वाटू लागते. आजी आपल्या नातवाला सेक्सविषयी समजून सांगते हे जरा जास्तच होते. असेही जाणवू लागते.

तिलोत्तमा, अमृता सुभाष यांच्या अभिनयानं मात्र लक्ष वेधून घेतले आहे. अमृतानं गेल्या काही सीरिज आणि चित्रपटांतून प्रभावीपणे आपल्या नावाचा ठसा चाहत्यांच्या मनात उमटवला आहे. त्यात लस्ट स्टोरीजच्या नावाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. काजोल आणि कुमूद मिश्रा यांच्या कथेनंही मात्र निराशा केल्याचे दिसून आले आहे.

-------------------------------------------------------------------------------

लस्ट स्टोरीज 2

कलाकार - काजोल , मृणाल ठाकुर , तमन्ना भाटिया , नीना गुप्ता , अमृता सुभाष , कुमुद मिश्रा , अंगद बेदी , विजय वर्मा आणि तिलोत्तमा

लेखक - अमित रविंद्रनाथ शर्मा , कोंकणा सेन शर्मा , पूजा तोलानी , आर बाल्की , ऋषि विरमानी , सौरभ चौधरी आणि सुजॉय घोष

दिग्दर्शक - आर बाल्की , कोंकणा सेन शर्मा , सुजॉय घोष आणि अमित रविंद्रनाथ शर्मा

निर्माता - रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ

रेटिंग - २.५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.