खलनायिका ते ऐतिहासिक भूमिका.. माधवी नीमकर साकारणार...

मराठीतील मालिका विश्वात खलनायिका म्हणून जिने आपली ओळख बनवली आहे. ती माधवी नीमकर आता ऐकतिहासिक भूमिकेत समोर येणार आहे.
madhavi nemkar as sayrabai in sher shivraj
madhavi nemkar as sayrabai in sher shivraj saka;
Updated on

मराठीतील मालिका विश्वात खलनायिका म्हणून जिने आपली ओळख बनवली आहे. ती माधवी नीमकर आता ऐकतिहासिक भूमिकेत समोर येणार आहे. माधवीने आजवर अनेक मालिका केले. 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेत तिने साकारलेली खलनायिका आजही अनेकांच्या डोळ्यांपुढे आहे. सध्या ती स्टार प्रवाहावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत 'शालिनी' हे पात्र साकारत आहे. बोली भाषा, घरातील दरारा आणि रोज नव्या कुरघोडी यामुळे तिचे पात्र चांगलेच पसंतीस उतरले आहे. सध्या माधवी निमकर खलनायिकेच्या पात्राबाहेर येऊन विविध भूमिका साकारत आहे.

madhavi nemkar as sayrabai in sher shivraj
आहेरात भारती सिंगने दिला कुकर, नीतू कपूर म्हणाल्या...

नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' चित्रपटात माधवीने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती, यावेळी माधवीचे विशेष कौतुक केले गेले. अत्यंत तरल आणि संवेदनशील पात्र माधवीने रंगवले. आता पुन्हा एकदा तिच्या वाट्याला एक मोठी ऐतिहासिक भूमिका आली आहे. ही भूमिका कदाचित माधवीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग ठरू शकते. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' या आगामी चित्रपटातून माधवी आपल्या भेटीला येणार आहे.

madhavi nemkar as sayrabai in sher shivraj
साक्षी तन्वरच्या 'माई'ची का होतेय चर्चा? काय आहे या वेब सिरीजमध्ये?

लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (digpal lanjekar) याने काही वर्षांपूर्वी शिवचरित्रावर आठ चित्रपटांची मालिका 'अष्टक' करणार असल्याची घोषणा केली होती. सध्या त्यातले तीन चित्रपट प्रदर्शित झाले असून चौथे पुष्प सज्ज झाले आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ नंतर आता लवकरच त्यांचा आ ‘शेर शिवराज’ (she shivraj) हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहेत. अफजल खान वधाची कहाणी सांगणारा हा चित्रपट असून २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे.

माधवी नीमकर या चित्रपटात एक महत्वाची भूमिका म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी सोयराबाई राणी सरकार. (madhavi nimkar as soyrabai rani sarkar in sher shivaj film) पावनखिंड चित्रपटातील दर्जेदार अभिनयामुळे याही चित्रपटात माधवी निमकर महत्वाच्या भूमिकेत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार आहे. माधवीचा सोयराबाई राणी सरकारांच्या भूमिकेतून लुक नुकताच रिव्हील आला असून माधवीच्या चेहऱ्यावरील तेज एखाद्या राणीसारखेच लाखाखत आहे. माधवीच्या या फोटोला. 'सांभाळू आम्ही आऊसाहेबांना, थोरल्या राणीसाहेबांना, बाळराजेंना आणि सगळ्यांनाच..... शब्द आहे आमचा!' असे कॅप्शन देण्यात आले आहे. यावरून सोयराबाईंचेही कार्य या चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचेल असे दिसते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.