Madhu Mantena Marriage : 'मधू मंटेना आहे तरी कोण?' आमिर ते अल्लु अर्जून सगळेच आले त्याच्या दुसऱ्या लग्नाला!

सोशल मीडियावर मधू मंटेनाच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली.
Madhu Mantena Marriage
Madhu Mantena Marriageesakal
Updated on

Madhu Mantena Marriag: बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांचे एका लग्नातील फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यात सलमान, आमिर, ऋतिक रोशन, अजय देवगण, काजोल हे सगळे दिसत आहे. बॉलीवूडचे सेलिब्रेटी सहसा एवढ्या प्रमाणात कुणच्या लग्नात गेल्याचे दिसत नाही. मात्र ते लग्न मधू मंटेनाचे होते.

सोशल मीडियावर मधू मंटेनाच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली. सगळेच सेलिब्रेटी मधूच्या लग्नाला कसे, तो आहे तरी कोण, त्याचे चित्रपट कोणते, त्यानं कोणत्या चित्रपटांची निर्मिती केली आहे असे प्रश्न नेटकऱ्यांनी गुगलवर टाकून मधूविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आपण मधू मंटेना आहे तरी कोण हे माहिती करुन घेणार आहोत.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

मधू मंटेनाचा जन्म ८ मे १९७५ रोजी हैद्राबादमध्ये झाला होता. तो आता बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आहे. त्याचा बॉलीवूडमध्ये दबदबा आहे. बॉलीवूडमधील कित्येक दिग्गज कलाकार त्याचे चांगले मित्र आहेत. मधूनं वयाच्या ४० व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. २०१५ मध्ये मधूनं नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा सोबत लग्न केलं होतं. तीन वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला. मधूनं त्यानंतर इराला डेट करण्यास सुरुवात केली होती.

मधूच्या आयुष्यात इरा त्रिवेदीची इंट्री झाल्यानंतर त्याची चर्चा सुरु झाली. त्यानं काही महिनेला तिला डेट केलं. मधूनं इरासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना तो धक्का होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मधूनं तिला दहा वर्षापूर्वीच तिला प्रपोझ केलं होतं. त्यांची ओळख ही दिल्लीतील एका कॉमन फ्रेंडनं करुन दिली होती. त्यानंतर इरानं मधूला तिच्या काही पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात निमंत्रित केले होते. त्यानंतर त्या दोघांमध्ये आणखी जवळीकता वाढली.

या चित्रपटांची केली निर्मिती.....

मधूनं आपल्या वीस वर्षांच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यात २००८ मध्ये आलेल्या गजनी या चित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटानंतर मधू मंटेनाकडे प्रथितयश निर्माता म्हणून पाहिले जाऊ लागले. या चित्रपटापासून त्यानं डेब्यू केलं होतं. त्यानंतर मधूनं रक्तचरित्र, मौसम, लुटेरा, हंसी तो फसी, अगली, क्वीन, हंटर चित्रपटांची निर्मिती केली.

याशिवाय बॉम्बे वेलवेट, उडता पंजाब, मसान, मनमर्जिया, ट्रॅप आणि हायजॅक सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यामुळे मधूचा बॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणात बोलबाला असल्याचे दिसून येते. म्हणूनच की काय त्याच्या दुसऱ्या लग्नाला बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटींनी गर्दी केली होती. त्यात आमिर खान पासून ऋतिक पर्यत अनेक सेलिब्रेटी हजर होते. ऋतिकच्या सुपर ३० नावाच्या चित्रपटाची देखील त्यानं निर्मिती केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.