सुरेल किस्से - सुभाषचंद्र जाधव
प्रत्येक भूमिकेचा सखोल अभ्यास करून त्या भूमिकेच्या अंतरंगात शिरणे ही दिलीपकुमारची खासियत होती. त्यामुळेच राज कपूर, अशोक कुमार, देव आनंद या त्याच्या समकालीन अभिनेत्यांपासून अमिताभ बच्चनसारख्या अनेक सुपरस्टारला तो पुरून उरला होता. गायनाच्या क्षेत्रात लतादिदी आणि अभिनयाच्या क्षेत्रात दिलीपकुमार हे शेवटचे शब्द मानले जातात.
अशा या ‘अभिनय- ए- आझम’ची फिरकी घेतली होती ती त्याच्याच आवडत्या मधुबालेने. ‘संगदिल’ चित्रपटाच्या वेळी घडलेला हा किस्सा...
चित्रपटातील प्रसंग तसा अगदी साधाच होता. दिलीपकुमार खूप थकलेला असतो आणि त्याची ती अवस्था पाहून मधुबाला त्याचे कारण विचारते. आता थकलेला चेहरा दिसण्यासाठी दिलीपकुमारने एक वेगळीच आयडिया लढविली. सेटवर दिलीपकुमार पळत-पळत गोलफेऱ्या मारू लागला आणि पळताना जेव्हा तो थकायचा तेव्हा पळत असतानाच ‘संगदिल’चे दिग्दर्शक आर. सी. तलवार यांना कॅमेरा चालू करण्याचा इशारा करून पटकन कॅमेऱ्यासमोर यायचा. त्यावेळी अर्थातच दिग्दर्शकाला हवे असलेले दिलीपच्या चेहऱ्यावरील मुद्राभिनय मिळायचे.
पण या प्रसंगामध्ये एक गोची होत असे. दिलीपच्या चेहऱ्याकडे पाहत मधुबालाला जे संवाद बोलायचे होते; ते मात्र जमत नसे. संवाद बोलण्याऐवजी मधुबाला एकटक दिलीपच्या चेहऱ्याकडे पहात बसे.
या प्रसंगाचे रिटेकवर रिटेक होत गेले. प्रत्येक वेळेला दिलीपकुमार सेटवर पळत-पळत फेऱ्या मारायचा आणि पटकन कॅमेऱ्याबरोबर यायचा; पण प्रत्येकवेळी मधुबाला तिचे संवाद बोलण्याऐवजी त्याच्या चेहऱ्याकडे पहात उभी राहायची. शेवटी दिलीपकुमारही चिडला. मी प्रत्येकवेळी पळतोय आणि तू मात्र लहान मुलीसारखी माझ्या चेहऱ्याकडे पहात उभी राहतेस.
दिलीपकुमारच्या या प्रश्नाला मधुबालाने जे उत्तर दिले त्याने मात्र दिलीपकुमारला कायमचा धडा मिळाला.
मधुबाला त्याला म्हणाली, ‘‘एक गोष्ट मला कळली नाही. एवढा तू अभिनय कुशल अभिनेता, पण अभिनय करण्यासाठी तुला एवढा द्रविडी प्राणायाम करावा लागत असेल तर मग आमच्यासारख्यांनी काय करावे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.